बॉलिवूड सृष्टीत आजवर अनेक मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मग मुख्य नायिकेची भूमिका ते मुख्य खलनायक रंगवण्यापर्यंत मराठी कलाकारांचा तेवढाच मोठा हातखंडा राहिलेला आहे. यात माधुरी दीक्षित, श्रेयस तळपदे, सोनाली कुलकर्णी, सोनाली बेंद्रे, अश्विनी भावे, किमी काटकर, हेमंत बिर्जे, सदाशिव अमरापूरकर, नाना पाटेकर, मोहन जोशी, अशोक सराफ अशी बरीच नावे घेता येतील. मात्र चित्रपटातून मुख्य भूमिकांखेरीज सहाय्यक भूमिका देखील तितक्याच महत्वपूर्ण मानल्या जातात. अशा भूमिकांमुळे देखील मराठी कलाकार बॉलिवूड सृष्टीत नावारूपाला आले आहेत.

‘स्टाईल’ हा बॉलिवूडचा रोमँटिक आणि सस्पेन्स थ्रिलर मुव्ही २००१ साली रिलीज झाला होता. या चित्रपटात खलनायिकेचा भूमिका रंगवली होती तारा देशपांडे या मराठमोळ्या अभिनेत्रीने. तारा देशपांडे हिने मॉडेलिंग करत असताना ९० च्या दशकात टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले होते. झी टीव्ही वरील कब क्यूँ कहां या क्विझ शो मध्ये ती होस्ट म्हणून झळकली होती. यानंतर ताराने बॉलिवूड सृष्टीत पाऊल टाकले इस रात की सुब नहीं, बडा दिन, बॉम्बे बॉईज, तपिश या चित्रपटात तिने मुख्य भूमिका रंगवल्या. स्टाईल चित्रपटात ताराने निक्की मल्होत्राचे विरोधी पात्र साकारले होते. मॉडेल, अभिनेत्री , लेखिका (पुस्तक फिफ्टी अँड डन) ते व्हडिओ जॉकी अशी बॉलिवूड सृष्टीत ओळख मिळवलेल्या ताराने कालांतराने चित्रपट क्षेत्रातून काढता पाय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून तारा खाद्य क्षेत्रात कार्यरत आहे. सोशल मीडियावर तिच्या रेसीपीजना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ‘अ सेन्स फॉर स्पाइस’ हे पुस्तक तिने लिहिले आहे यात प्रामुख्याने कोकणी पद्धतीने पदार्थ कसे बनवले जातात याची माहिती देण्यात आली आहे.

फूड रायटर शेफ अशी ताराने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट क्षेत्रात कार्यरत असताना डॅनियल सोबत तिने आपला संसार थाटला होता. नुकतेच भाऊ कदम सोबत तिने गोदरेज व्हेजिटेबल ऑइलची एक जाहिरात केली होती. अभिनय क्षेत्र सोडून तारा आता शेफ बनून प्रसिद्धी मिळवत आहे. अशा शोजसाठी तिला आता परीक्षक म्हणूनही बोलवण्यात येऊ लागले आहे. सोशल मीडियावर ताराने बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळतात मात्र कधीकाळी ती चित्रपटातही झळकली होती याची कल्पना देखील कोणी केली नसावी. बॉलिवूड सृष्टीतील ही अभिनेत्री एक मराठमोळी आहे यावर देखील अनेकांना विश्वास बसला नसेल.