सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या आपल्या भारत देशात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. विविध जातीच्या धर्माच्या नागरिकांना एकत्र आण्यासाठी सणांचा खूप मोठा हातभार लाभतो. विशेषतः महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त सण साजरे केले जातात कारण संपूर्ण भारतातील विविध जाती धर्माचे लोक महाराष्ट्रात राहतात. शिवजयंती, गुडीपाडवा किंवा गणरायाची मिरवणूक ह्यात ढोल ताशा चा खूपच वापर केला जातो. आजकालच्या धावत्या युगातही जुने वाद्य ढोल ताशा लेझिम ह्यांना युवापिढी उत्स्फुर्तपणे प्रसिसाद देताना पाहायला मिळते. आज आपण अश्याच एका पथकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने भारतातच नाही तर भारताबाहेर हि ढोलताशाचा नाद घुमवला.

काही वर्षांपूर्वी तुम्ही स्पेनमध्ये व्हायरल झालेला ढोलताशाचा व्हिडिओ पाहिला असेल. अनेक स्पेन नागरिक ह्या ढोल ताश्याच्या तालावर ताल धरताना देखील पाहायला मिळाले. स्पेनमधील नागरिकांनी देखील तोंडभरून ह्याचं कौतुक केलं. पण मित्रानो हे घडवून आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, अनेक युवक युवतींना एकत्र आणून हे काम साध्य करणाऱ्या युवकाचा नाव आहे “प्रसाद पिंपळे”. प्रसाद हा स्वरगंधार ढोल ताशा पथकाचा संचालक आहे. ह्या पथकाने अनेक सामाजिक कामे देखील केली आहेत. जुनी वाद्य आणि परंपरा जपण्यासाठी स्वरगंधार ढोल ताशा पथकाची निर्मिती झाली. स्वरगंधारच्या माध्यमातून अनेक मराठी युवक युवतींना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील स्वरगंधारने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या को’रिनाच्या काळात स्वरगंधार मार्फत रक्तदान शिबीर तसेच गरजू लोकांना अन्नदान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हि करण्यात आले इतकंच नाही तर को’रिनाच्या काळात पोलिस तसेच साफसफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मदत केलेली पाहायला मिळते. पुढे देखील ते हे कार्य असच चालू ठेवणार असल्याचं ते सांगतात. स्पेनच नाही तर अनेक देशात जाणून तेथील नागरिकांना आपल्या रूढी परंपरांची ओळख करून देण्याचं मोठं स्वप्न स्वरगंधारने पाहिलं आहे. आमच्या संपूर्ण टीम कडून स्वरगंधार आणि त्यांच्या टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…