गेल्या एक दोन वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करण्यात येऊ लागलं आहे. शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाला सुद्धा जोरदार विरोध दर्शवला जात आहे. मात्र असे असले तरी पठाण चित्रपटाचे तिकीट अगोदरच बुकिंग करण्यात येऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेले बरेचसे बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले आहेत. याचा फायदा दाक्षिणात्य तसेच मराठी चित्रपटांना होत आहे. दाक्षिणात्य चित्रपट तर बॉक्सऑफिसवर ५०० कोटींच्या वर कमाई करत आहेत. तर तिथेच बॉलिवूड वाल्यांना मात्र मुश्किलीने शंभर कोटींचा आकडा पार करावा लागला आहे. त्यामुळे आपला झालेला खर्च सुद्धा या निर्मात्यांना कमावता येत नाही अशी चिन्ह समोर आली. यावर आर माधवनने एक भाष्य केलेले आहे.

जर बॉलिवूड चित्रपट चांगले बनवले जातात असतील तर ते नक्कीच प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणतील. दाक्षिणात्य चित्रपट चालण्या बाबत आर माधवन म्हणतो की, दाक्षिणात्य सृष्टी आणि बॉलिवूड यांच्यात स्पर्धा कधीच नाही. पुष्पा, बाहुबली, बाहुबली २, आर आर आर, केजीएफ असे मोजके सहा ते सात चित्रपट खूप गाजले. बॉलिवूडच्या तुलनेत या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली मात्र केवळ सहा सात चित्रपट चालले म्हणून त्याची स्पर्धा बॉलिवूडशी आहे असे मुळीच नाही. तुम्ही चांगला कंटेंट आणला, चांगले कलाकार आणले की लोक आपोआप बॉलिवूड कडे खेचले जातील. अभिनयाचा दर्जा, कथानकाचा दर्जा सुधारला की या गोष्टी शक्य आहेत. बॉलिवूड सृष्टीला कुठल्या आधाराची गरज नाही. मला असं वाटतं की, कोविडच्या नंतर लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. पण तुम्ही जर चांगला कंटेंट लोकांसमोर आणला तर ते नक्कीच तुमचा चित्रपट पाहायला येतील. आर माधवन हा नेहमी मोजक्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे. याबद्दल तो म्हणतो की, मी माझ्या चित्रपटात नेहमी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असतो. वर्षातून पाच सहा चित्रपट बनवावेत अशी माझी ईच्छा नाही मात्र जो चित्रपट बनतोय त्यावर माझे जास्त लक्ष्य राहिले आहे.

याचमुळे मी नेहमी कमी चित्रपटातून पाहायला मिळतो. आजकाल सर्वसामान्य लोकं सुद्धा सिक्स पॅक बनवत आहेत. रिऍलिटी शोमध्ये लहानलहान मुलं जी डान्स करतात ते खूपच कौतुकास्पद असते. त्यामुळे आम्हा कलाकारांना स्टार म्हणवून घ्यायला कुठेतरी भीती वाटते. दर्जेदार चित्रपट बनवण्यासाठी खूप वेळ लागतो.असे चित्रपट खूप कमी आहेत जिथे तुम्हाला तुमच्या नृत्याचे, अभिनयाचे कौशल्य दाखवता येईल. त्यामुळे आपल्यासाठी असे चित्रपट कोणीतरी लिहावेत अशी अपेक्षा असते. मी नवनवीन दिग्दर्शकांसोबत असे कमी केले आहे आणि माझं त्यांच्यासोबत छान सूर सुद्धा जुळले आहेत. वर्षातून मी कमीत कमी तीन चित्रपट करू शकतो मात्र तसं मुळीच घडत नाही. पण असे दर्जेदार चित्रपट बनवण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. अशी खंत आर माधवन यांनी नुकतीच व्यक्त केली होती आणि त्याचे हे शब्द देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.