बॉलिवूड

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या लेकीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या लेकीचे म्हणजेच “अल्लू अरहा”चे अभिनय क्षेत्रात पदार्पण होत आहे. अभिनेत्री समंथा अक्कीनेनी हिच्या “शाकुंतलम” या आगामी चित्रपटात अल्लू अर्जुनची लेक मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अल्लू अरहा ‘राजकुमार भरत’ ची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारत असताना अल्लू अर्जुनच्या लेकीला सेटवर एखाद्या राजकुमारीसारखी ट्रीट दिली जात आहे. तसेच सेटवर तिची खूप काळजी देखील घेतली जात आहे अरहासोबत चित्रपटाच्या सेटवर तिची आई म्हणजेच अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा देखील हजर असते. या दोघींची तिथे विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

allu arjun daughter
allu arjun daughter

स्वतः अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करून आपल्या घराण्याची चौथी पिढी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असल्याचे सांगून आपल्या लेकीचा एक फोटो शेअर केला आहे. या चित्रपटाअगोदर अल्लू अरहा अंजली अंजली या गाण्यात झळकली होती मात्र मोठ्या पडद्यावरून ती पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकत आहे. वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी ती शाकुंतलम या आगामी दाक्षिणात्य चित्रपटात अरहा बालपणीच्या भरतची भूमिका साकारणार आहे. शाकुंतलम या चित्रपटात मल्याळम चित्रपट अभिनेता देव मोहन हा दुष्यंतची भूमिका निभावणार आहे तर समंथा अक्कीनेनी शकुंतलाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू करण्यात आले आहे मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येईल हे गुलदस्त्यात ठेवले आहे. तुर्तास अल्लू अर्जुन आपल्या लेकीच्या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी खूपच खुश आहे हे त्याने केलेल्या पोस्टवरूनच तुमच्या लक्षात येईल. अल्लू अरहाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने तिच्या काकानेही म्हणजेच अल्लू सिरिशनेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अरहाला शुभेच्छा देत अल्लू सिरिशची पोस्ट देखिल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button