Breaking News
Home / जरा हटके / ३०० हुन अधिक चित्रपटात काम करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे हाल सरकारी दवाखान्यात उपचारासाठी झाल्या दाखल

३०० हुन अधिक चित्रपटात काम करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे हाल सरकारी दवाखान्यात उपचारासाठी झाल्या दाखल

आताच्या घडीला कलाकारांना चित्रपट तसेच मालिकेमधून चांगले मानधन मिळते. त्यामुळे कलाकार आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालेली पाहायला मिळतात. मात्र पूर्वीच्या काळी कलाकारांना खूप कमी मानधन दिले जायचे. याची प्रचिती अनेकदा समोर आली आहे कारण बरीचशी कलाकार मंडळी वृद्धापकाळात आर्थिक दृष्ट्या कमकुवत होऊन स्वतःच्या उपचारासाठी दुसऱ्यांकडे मदत मागताना पाहायला मिळाली आहेत. अशातच दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री जयकुमारी यांना देखील आर्थिक चणचण भासू लागली आहे. उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून मदतीसाठी आवाहन करत आहेत. जयकुमारी या दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री आहेत.

actress jaykumari
actress jaykumari

६० ते ७० दशकात चित्रपटात काम करून त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती . आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ तसेच मल्याळम असे ३०० हुन अधिक चित्रपटात काम केले आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना किडनीच्या उपचारासाठी सरकारी दवाखान्याची मदत घ्यावी लागली आहे. जयकुमारी यांना तीन अपत्ये आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. पतीच्या निधनानंतर त्या आपल्या मुलाकडेच राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून जयकुमारी या किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. मात्र त्यावरील उपचारासाठी त्यांना लाखो रुपये लागणार आहेत. पुरेशा पैशाअभावी त्यांना चेन्नई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागले यावेळी त्या अभिनेत्री आहेत हे लोकांना समजले. रुग्णालयातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. यातूनच लोकांना त्यांनी मदतीचे आवाहन केलेले पाहायला मिळत आहे. तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम यांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. आणि ताबडतोब रुग्णालयात जाऊन त्यांनी जयकुमारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मदतिचे आश्वासन जयकुमारी आणि त्यांच्या कुटुंबियाला दिलेले आहे. सरकारकडून जयकुमारी यांच्यावर उपचार केले जातील असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

jaykumari in goverment hospital
jaykumari in goverment hospital

१९६८ सालच्या कलेक्टर मलाथी या मल्याळम चित्रपटातून जयकुमारी यांनी पदार्पण केले होते. फुटबॉल चॅम्पियन, मन्नीना मगा, हरमना, अनाथाई आनंदन अशा जवळपास ३०० हुन अधिक चित्रपटातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटातून काम करून देखील वृद्धपकाळात त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. अतिशय तुटपुंजे मानधन आणि कुटुंबाची जबाबदारी अशातच पतीच्या निधनामुळे त्यांचे खूप हाल होत आहेत. अशातच किडनीच्या उदभवलेल्या आजारपणामुळे पुरेशा पैशाअभावी त्यांनी सरकारी रुग्णालयात जाणे पसंत केले मात्र यावरील उपचाराचा भार पेलता येणार नसल्याने अखेर त्यांनी जनतेकडे मदत मागण्याचे ठरवले. त्यांच्या या आवाहनाला तामिळनाडू सरकार धावून आल्यामुळे जयकुमारी यांनी निश्वास टाकला आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.