Breaking News
Home / जरा हटके / सोशिअल मीडिया स्टार “नवरा बायको” ची जोडी निखिल आणि हर्षदाने घेतली नवी कार

सोशिअल मीडिया स्टार “नवरा बायको” ची जोडी निखिल आणि हर्षदाने घेतली नवी कार

स्वत:चे घर असावे, एक गाडी असावी हे स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. आणि ते स्वप्न जेव्हा पूर्ण होते तेव्हा तो आनंद सर्वांसोबत शेअर करावा असेही प्रत्येकालाच वाटते. असाच आनंद सध्या प्रसिध्द यूटय़ूबर कपल निखिल आणि हर्षदा वाघ यांच्या आयुष्यात आला आहे. इन्स्टा, यूटय़ूब, फेसबुक पेज अशा सोशलमीडिया प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्टीव्ह असलेल्या निखिल आणि हर्षदा या जोडीने नुकतीच एक नवीकोरी कार खरेदी केली. वाघ कुटुंबातील ही पहिलीच कार असल्याचे सांगत निखिलने कारसोबतचा व्हिडिओ त्याच्या फॉलोअर्स आणि चाहत्यांपर्यंत पोहोचवला आहे.

nikhil and harshada wagh
nikhil and harshada wagh

विशेष म्हणजे वाघ कपलच्या व्हिडिओमध्ये दिसणारया निखिलच्या आईंच्या हस्ते नवी गाडी स्टार्ट केली. दोन वर्षापूर्वी कोरोना लॉकडाउनकाळात अनेकांनी सोशलमीडियावर रिल्स, व्हिडिओ बनवून एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यापैकीच निखिल आणि हर्षदा या जोडीने त्यांच्या रोजच्या आयुष्यातील नवराबायकोत होणारे संवाद, घरातील गमतीजमती, सासूसुनेच्या गप्पा असे अनेक मजेशीर व्हिडिओ निखिलने शेअर करत असतो. दोन वर्षापूर्वीच निखिल आणि हर्षदाचे लग्न झाले असून घरात ते निखिलच्या आईसोबत राहतात. मूळचे सांगलीकर असलेल्या निखिल आणि हर्षदा या जोडीची केमिस्ट्री त्यांच्या व्हिडिओमधून दिसत असते. अगदी दोन मिनिटांच्या व्हिडिओमधून त्यांनी आजपर्यंत भरपूर मनोरंजन केले असून सोशलमीडियावर या जोडीचे मिलियन्सच्या घरात फॉलोअर्स आहेत. दीडवर्षापूर्वी सुरू केलेल्या यूटय़ूब चॅनेलवरील त्यांच्या व्हिडिओला इतका प्रतिसाद मिळाला की त्यातून त्यांची लाखाच्या घरात कमाई सुरू झाली. पण ह्या व्यतिरिक्त देखील तो स्वतःच कॉम्पुटर क्लास चालवतो असं त्याने काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होत.

nikhil wagh mother
nikhil wagh mother

निखिलने नवी गाडी खरेदी केल्यानंतर त्याचाही व्हिडिओ शेअर केला आहे. निखिल सांगतो, आमच्या कुटुंबात यापूर्वी चारचाकी गाडीच नव्हती. माझ्या आईलाही वाटायचे की आपली एक गाडी असावी. गाडी घेण्याचे स्वप्न मी खूप दिवसांपासून पाहत होतो मात्र त्यासाठी आर्थिक जोडणी नव्ह्ती. माझ्या आणि हर्षदाच्या व्हिडिओला जो आमच्या फॉलोअर्सनी प्रतिसाद दिला त्यामुळेच आमचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. लाल रंगाची सुझुकीची कार खरेदी केल्यानंतरचा आनंद वाघ फॅमिलीच्या चेहरयावर ओसंडून वाहत होता. गाडी शोरूमबाहेर आणल्यावर निखिलने आईला स्टेअरिंगसीटवर बसवले. आईच्या हस्ते त्यांनी हि नवी कोरी गाडी स्टार्ट केली. निखिलच्या या व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. महाराष्ट्राची हि लाडकी जोडी पुढे देखील असच सर्वांचं मनोरंजन करो हीच सदिच्छा …

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *