आजकालच्या सोशिअल मीडियाच्या जमान्यात काहीही व्हायरल होताना पाहायला मिळतं. अनेक अभिनेते अभिनेत्री अश्या व्हिडिओना कमेंट करतात आणि मग तो व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतो. काही दिवसांपासून सर्रास आपल्याला बचपन का प्यार मुझे भूल नाही जाणारे हे गाणं तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतंय. ह्या गाण्यात एक मुलगा शाळेतील शिक्षकांसमोर बचपण का प्यार हे गाणं आपल्या स्टाईलने गाताना पाहायला मिळतोय. पण मित्रानो हा व्हिडिओ काही आत्ताच नाही बरका .. हा विडिओ देखील २०१९ मध्येच शूट झाला आहे.ह्या मुलाचं नाव आहे सहदेव. पण अनेकांना ह्या गाण्याचं खरं गाणं आणि खरे बोल काय होत हे माहित नसतील….

२०१९ साली “कमलेश बोराटे” ह्यांचा “सोनू मेरी डार्लिंग जानू मेरी जानेमन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे” ह्याचा व्हिडिओ सोशिअल मीडियावर अपलोड देखील केला होता. हेच गाणं नंतर सहदेवने आपल्या स्टाईलने गायलं आणि ते खूपच व्हायरल झालं.ह्या गाण्याला उत्तर भारतातून खूपच प्रसिद्धी मिळाली होती. रॅपर बादशाहने ह्याची दाखल घेत पुन्हा हे गाणं सहदेवसोबत गेल्यामुळे हे गाणं पुन्हा चर्चेचा विषय ठरलं. इतकंच काय तर अनेक राजकीय लोकांनी देखील सहदेवसोबत फोटो काढायला सुरवात केली. अनेक मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींनी देखील ह्या गाण्यावर कॉमेडी व्हिडिओ बनवले आहेत. खासकरून इंस्टाग्रावर हे गाणं खूपच व्हायरल झालं आहे. अनेकांना माहित नसेल कि ह्याच मूळ गाणं आहे तरी काय तर त्याच उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल त्याचे बोल आहेत “सोनू मेरी डार्लिंग जानू मेरी जानेमन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे” . चला तर पाहुयात ह्या गाण्याचा खरा व्हिडिओ आणि खरे बोल नक्की होते तरी कसे…