
बॉलिवूड सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आपल्याच क्षेत्रात असणाऱ्या कलाकारांशी विवाहबद्ध होत असतात. मराठी सृष्टीतही असे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतात. स्वप्नील बांदोडकर त्याच्या सुरेल गाण्यांनी मराठी सृष्टीत ओळखला जातो. राधा ही बावरी हे गाणं त्याने अनेक कार्यक्रमात गायलं आहे. राधा ही बावरी प्रमाणे गालावर खळी, ओल्या सांजवेळी, का कळेना कोणत्या, गणाधिशा, परी म्हणू की सुंदरा, वादळवाट, मला वेड लागले अशी अनेक गीतं त्याने गायली आहेत आणि ती आजही रसिकप्रेक्षकांच्या ओठावर आहेत. या गाण्याची क्रेझ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. बेधुंद, तुला पाहिले, मितवा, तू माझा किनारा अशा अनेक अल्बममधून तो लोकप्रिय झाला आहे.

बॉलिवूड मराठी चित्रपट अभिनेत्री पल्लवी जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांच्यात कौटुंबिक नातेसंबंध आहेत हे बऱ्याचजनांना माहीत नसेल. पल्लवी जोशी यांनी सारेगमप सारख्या आणि अंताक्षरी सारख्या रिऍलिटी शोमधून सूत्रसंचालिका म्हणून काम केले होते. पल्लवी जोशी यांच्या आई सुषमा जोशी या उत्तम गायिका तसेच संगीत शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यामुळे जोशी कुटुंबियाच्या घरातील वातावरण संगीतमय असायचं. बालपणापासूनच पल्लवी जोशी आणि अलंकार जोशी बॉलिवूड चित्रपटातून बालकलाकाराची भूमिका साकारताना दिसले आहेत. स्वप्नील बांदोडकरची पत्नी संपदा बांदोडकर ही पल्लवी जोशींची मावस बहीण आहे. या नात्यामुळे स्वप्नील बांदोडकर हे पल्लीवी जोशी यांचे मेहुणे लागतात. त्यामुळे संगीत क्षेत्राशी त्यांच्या कुटुंबाचं अगदी घट्ट नातं विणलं आहे. स्वप्नील बांदोडकर याची पत्नी संपदा ही देखील पार्श्व गायिका आहे. पुण्यातील संक्रम म्युजिक अकॅडमी येथे त्या डिपार्टमेंट हेड म्हणून कार्यरत आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या संपदा बांदोडकर यांनी संगीत शिक्षिका म्हणून अनेक नवख्या कलाकारांना संगीताचे प्रशिक्षण दिले आहे.

तसेच अनेक मंचावरून त्यांनी आपल्या गायकीची झलक दाखवून दिली आहे. स्वप्नील बांदोडकर प्रमाणे संपदा बांदोडकर यांनी देखील संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पल्लवी जोशी यांचे संपूर्ण कुटुंबच चंदेरी दुनियेशी निगडित आहे. आई गायिका तर त्यांचा भाऊ अलंकार जोशी हा बॉलिवूड सृष्टीत बालकलाकार म्हणून नावारूपाला आला होता तर त्यांची बहीण पद्मजा जोशी कदम यांनी देखील मराठी चित्रपटातून काम केले आहे. पद्मजा जोशी विजय कदम यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. अभिनेत्री पल्लवी जोशी ह्यांचा संपूर्ण परिवार अभिनय क्षेत्राशी निगडित असलेला पाहायला मिळतो. काही गायक तर काही अभिनय तसेच काही फिल्म प्रोड्युसर म्हणून काम पाहतात. पल्लीवी जोशी काश्मीर फाईल्स चित्रपटामुळे चांगल्याच गाजल्या. पण प्रेक्षक आजही त्यांना लिटिल चॅम्प्स मधील सूत्रसंचालिका म्हणूनच जास्त ओळखतात.