
रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन आपलं पोट भरणारी राणू आपल्या आवाजामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली. सोशिअल मीडियावर तीच गाणं तुफान व्हायरल झालेलं पाहायला मिळालं. त्यानंतर हिमेश रेशमियाने तिला गाण्याची संधी दिली आणि गाणं म्हणून पोट भरणाऱ्या राणूने लाखो रुपये कमावले आपलं स्वतःच नवीन घर देखील घेतलं. पण तिची हि प्रसिद्धी पाहून अचानक जागी झालेली तिची मुलगी “हीच माझी आई” म्हणून तिला आपल्या घरी घेऊन आली. अगदी गळ्यात गळे घालून दोघीनी अनेक गाणी देखील गायली. माझी आई हरवली होती ती पुन्हा मला मिळाली आता माझा आनंद गगनात मावत नाही असं देखील ती म्हणाली होती.

अनेक टीव्ही रिऍलिटी शोमध्ये देखील रानूला बोलावलं जायचं. अनेकदा विमानातून प्रवास करताना तिचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले. आपल्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढायला आलेल्या लोकांना ती जवळ देखील येऊ देत नव्हती. जसजशी तिची प्रगती होत गेली तसा तिचा अहंकार देखील वाढला. कॅमेऱ्यासमोर देखील ती अनेकदा उद्धटपणे वागताना पाहायला मिळाली. पण गेल्या वर्षी आलेल्या महामारीच्या काळामुळे टीव्ही शो बंद पडले आणि तिला गाण्याच्या येणाऱ्या ऑफर देखील येणं बंद झालं. शेवटी राहत घर देखील तिला सोडावं लागलं. आता पुन्हा ती हलाकीच जीवन जगताना पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे उमेदीच्या दिवसांत हीच आपली आई असं म्हणणारी तिची स्वतःची मुलगी देखील तिला सोडून गेलीय. राणू आता पुन्हा एकटी जीवन जगतेय. ती ज्या घरात राहते ते एक पडक घर असून त्यात उपजीविका जगण्याची साधन सामुग्री देखील नाहीये. आता पुन्हा हिमेश रेशमियाने आपल्याला काम द्यावं अशी तिने विनंती केली आहे कारण तिच्या गाण्यामुळे हिमेशने कोट्यवधी रुपये कमावले असून आपल्या वाईट दिवसांत तरी त्याने पुन्हा तिला मदत करावी अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.