
वयाच्या अवघ्या ४ ते ५ वर्षांपासून आर्या गायनाचे प्रशिक्षण घेत होती. सारेगमप लिटिल चॅम्प शोमध्ये तिने भाग घेतला आणि तिच्या आवाजाची भुरळ अख्या महाराष्ट्राला पडली. थोड्याच दिवसात ती सर्वांची लाडकी गायिका देखील बनली. सारेगमप लिटिल चॅम्प हा ‘किताब तिला मिळाला नसला तरी टॉप यादिमीमध्ये तिने आपलं स्थान मिळवलं. लिटिल चॅम्प नंतर देखील तिने अनेक स्टेज शो मधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. इतकंच नाही तर ती सध्या काय करते ह्या चित्रपटात अभिनय देखील केला ह्या चित्रपटासोबत तिने अनेक मराठी चित्रपटांची गाणी देखील गायली आहेत. झी मराठीवरील अनेक मालिकांचे शीर्षक गीत देखील तिने गायले आहे. पण एका चर्चेच्या मुद्यावर तिने नुकताच खुलासा केलाय चला तर पाहुयात ती काय म्हणते….

एका प्रसिद्ध गायकाला आर्या डेट करत असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत आहे. अनेक फेक न्युज सोशिअल मीडियावर रेंगाळत आहेत. अनेकांनी मला त्यासंदर्भात म्यासेज देखील केले आहेत. आता मला व्यक्त व्हायचंय. मी सोशिअल मीडियावर अनेक दिवसांपासून ऍक्टिव्ह आहे. माझे फॉलोवर्स हे ऑरगॅनिक आहेत. फेसबुक इंस्टाग्राम किंवा युट्यूब ह्यांना मी कधीही पे केलेलं नाही. फॉलोअर्स, सबस्क्रायबर आणि व्हूवज् विकत घेण्याच्या संकल्पनेवर माझा विश्वास नाही आणि मी त्याच्या विरोधात आहे आणि ते माझ्या नैतिकतेत बसत नाही. एखादं प्रमोशन किंवा गाण्याचा कार्यक्रम ती स्वतः मेल किंवा मॅसेज करून किंवा रिप्लाय देऊन हान्डेल करत असते. मी एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा खूप दिवसांपासून पाहतेय मी परत सांगू इच्छिते कि ती व्यक्ती माझे मार्गदर्शक आहेत. मी नेहमीच त्यांचा आदर करते आणि पुढे देखील करत राहील आणि मला त्यांचं नेहमीच कौतुक वाटत आलय. असं तिने नमूद केलं आहे. सोशिअल मीडियावर नेहमीच अनेक अफवा पसरवलेल्या पाहायला मिळतात पण त्यांना किती प्राधान्य द्यायचं हे नेटकाऱ्यानी समजून घेतलं पाहिजे.