भोजपुरी चित्रपटाचा आणि त्याच्या गाण्यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. या गाण्यांमधून ओळख मिळवलेला खेसारीलाल यादव हा प्रसिद्ध गायक आता मोठ्या अडचणीत सापडलेला पाहायला मिळाला आहे. नुकतेच एका व्हिडिओच्या माध्यमातून खेसारी लालने भोजपुरी इंडस्ट्री सोडण्याचे वक्तव्य केले आहे. मला फक्त काम करू द्या अशी विनंती तो सगळ्यांना करतो आहे. खेसारीलालवर रडण्याची वेळ का आली आणि तो इंडस्ट्री सोडून जाण्याचा निर्णय का घेत आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. खेसारीलाल यादव हा भोजपुरी गायक अनेक लाईव्ह शो करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला त्रास दिला जात असल्याची माहिती समोर आलेली पाहायला मिळते. आपल्या चुकीच्या गोष्टींमुळे मुलीला का टार्गेट केलं जातंय ही खंत त्याने व्यक्त केली आहे.

‘मी दिवसरात्र फक्त मनोरंजनाचे काम करतो, मला फक्त काम करू द्या. मी भोजपुरी भाषेसाठी काहीच केलं नाही आणि यापुढेही काही करणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी जनतेला विचारु इच्छितो की मी तुमचे मनोरंजन करू शकलो नाही का?. मी दिवसरात्र, थंडी असो पाऊस असो ,आजारी असलो तरीही काम केलं आहे. पण तरीही तुम्हाला अस वाटतं का की मी भोजपुरी इंडस्ट्रीच्या लायक नाही? मी भोजपुरी समाजाच्या लायक नसेल तर मी हा समाज सोडून ही इंडस्ट्री सोडून जायला तयार आहे. गेल्या काही दिवसांपासून माझे २०० गाणी डिलीट झाली आहेत. लोकं माझी गाणी चोरी करून स्वतःच्या नावावर खपवत आहेत. का तर माझ्याकडे कंपनी नाही केवळ दोन चार कंपनी साठी मी गाणी गातो त्यांच्यासाठी मी किती काम करणार. मी महिन्याला २० ते ३० गाणारा व्यक्ती आता फक्त १० च गाणी गात आहे.माझं काम थांबवलं आहे. मी २४ तास काम करणारा माणूस आहे. प्रसिद्धी मिळवण्यागोदार लोकांच्या घरी नोकर म्हणून मी काम केलं आहे, दूध विकलं आहे , लिट्टी चोखा विकलं आहे तिथून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मी कुठेही मेहनत केली तरी माझ्या बायको मुलांचं मी पोट भरू शकतो. पण मला हा त्रास दिला जात आहे तो मी आयुष्यात कधीही अनुभवला नव्हता. माझी एक चूक झाली पण त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला सगळीकडून त्रास दिला जातोय.

माझ्या मुलीसमोर मी कसा जाऊ? माझ्यामुळे तिला बदनाम केलं जात आहे. मी तिला फोनही करू शकत नाही’ मुलीची माफी मागून खेसारीलाल आपलं बोलणं संपवतो. खेसारीलाल असं का म्हणाला त्याला एक कारण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात खेसारीलालच्या जवळच्या मित्राने एका मुलाला कानाखाली वाजवली होती. यामुळे राजपुर समाज खेसारीलालवर चांगलाच भडकला. खेसारीलालची मुलगी कृती यादव हिला काही जणांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कृतीचे फोटो वापरून अश्लील गाणी प्रसिद्ध करण्यात आली. यामुळे खेसारीलाल मोठ्या अडचणीत सापडलेला पाहायला मिळाला आहे. आपल्या चुकीच्या गोष्टींमुळे मुलीला का टार्गेट केलं जातंय ही खंत त्याने व्यक्त केली आहे. दरम्यान खेसारीलालच्या बाजूने बोलण्यास अजूनही कोणत्या कलाकाराने पुढाकार घेतला नसला तरी भोजपुरी प्रेक्षकांनी त्याच्या बाजूने बोलण्यास आता सुरुवात केली आहे.