आपल्या स्वप्नातलं घर असो किंवा गाडी खरेदी करणे आयुष्यात येणारे हे सुखद क्षण एक वेगळाच आनंद मिळवून देत असतात. असाच काहीसा अनुभव अजय अतुल फेम अतुल गोगावले यांनी प्रत्यक्षात अनुभवला आहे. अतुल गोगावले यांनी नुकतीच एक लविश बाईक खरेदी करून आपले आणखी स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. अजय आणि अतुल या मराठमोळ्या संगीतकार जोडीने भारतातच नव्हे तर जगभर आपल्या संगीताचा डंका वाजवला आहे. त्यामुळे त्यांच्या संगीताचे जगभर अनेक चाहते तुम्हाला पाहायला मिळतील. अजय अतुल यांचे बालपण पुण्यातील खेड मंचर सारख्या परिसरात गेले.

शालेय जीवनात असल्यापासूनच या दोघा भावंडांना संगीताची गोडी निर्माण झाली होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने नवीन कुठले गाणे ऐकायचे असल्यास ते त्यांच्या मित्रांकडे जाऊन ऐकत असत. अशातच संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग त्यांनी करण्यास सुरुवात केली. संगीत क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसताना मुंबईत येऊन नॉन फिल्मी गाणी बनवली. यातून त्यांना जिंगल्स, नृत्य नाट्य, व्यावसायिक जाहिरातींमधून संगीत दिले. मन उधाण वाऱ्याचे, मल्हारवारी, कोंबडी पळाली या गण्यांमुळे अजय अतुल हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. बॉलिवूड चित्रपटातूनही त्यांनी आपल्या संगीताची भुरळ प्रेक्षकांना घातली. संगीत क्षेत्रातील एक मोठं प्रस्थ त्यांनी निर्माण केलं. अशातच आपली एकेक स्वप्न पूर्ण करत ही कलाकार जोडी पुढे जाताना दिसत आहे. अतुल गोगावले यांनी नुकतीच BMW R1250 GS ही स्पोर्ट बाईक खरेदी केली आहे. आज हे स्वप्न पूर्ण झाल्याने अतुल गोगावले यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या सपोर्ट बाईकची मार्केट व्हॅल्यू साधारण २२ ते २५ लाख इतकी आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील विश्वजित काका म्हणजेच अभिनेते आनंद काळे यांना देखील स्पोर्ट्स बाईकची भयंकर आवड आहे. आनंद काळे यांच्याकडे अशा अनेक लक्झरी बाईक्स आणि लक्झरी कार आहेत. अतुल गोगावले यांनी स्पोर्ट्स बाईक खरेदी केल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच आनंद काळे यांनी अतुल यांचे अभिनंदन करत ‘चला आता राईडला लेह लडाख इन जुलै’…अशी छानशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे येत्या काही काळात अतुल गोगावले ह्या नव्या कोऱ्या बाईकवरून लॉंग ड्राईव्हला जायला निश्चितच उत्सुक असलेले पाहायला मिळणार आहेत. आता महागडी स्पोर्ट बाईक घेऊन लॉंग टूर करायची नाही तर मग गाडी घायची मज्जाच काय त्यामुळे आता गाडी घेऊन अतुल गोगावले आपल्या मित्र मंडळींसोबत भटकंती करताना नक्कीच पाहायला मिळतील यात शंका नाही.