news

मराठी सृष्टीतील आणखी एका सेलिब्रिटीची लगीनघाई….अशुच्या केळवणाचा सजला थाट

मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. बऱ्याचशा प्रसिद्ध सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधून आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. प्रथमेश परब, तीतीक्षा तावडे, शिवानी सुर्वे, पूजा सावंत, योगिता चव्हाण या सेलिब्रिटींची लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. या पाठोपाठ आता अश्विनी एकबोटे हिचा मुलगा शुभंकर एकबोटे लवकरच विवाहबद्ध होताना दिसणार आहे. शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने यांची लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यात या दोघांनी मोठ्या थाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता त्यांच्या केळवणाचा थाट पाहायला मिळत आहे.

नुकतेच शुभंकर आणि अमृताचे पहिले केळवण साजरे करण्यात आले आहे. हॅशटॅग अशु चं केळवण असे म्हणत त्यांनी पहिल्या केळवणाचा थाट सोशल मीडियावर शेअर करून लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचे म्हटले आहे. शुभंकर आणि अमृता दोघेही कन्यादान या मालिकेतून एकत्रित काम करत होते. रील लाईफ कपल अशी मालिका सृष्टीत ओळख बनवलेल्या या जोडीने रिअल लाईफमध्येही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभंकर एकबोटे हा आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल झाला. सहाय्यक भूमिकेने त्याने मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत जम बसवण्यास सुरुवात केली पण कन्यादान मालिकेत त्याला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याच मालिकेतील त्याची नायिका अमृता बने हिला पहिल्या भेटीत पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता.

shubhankar ekbote and amruta bane wedding kelwan
shubhankar ekbote and amruta bane wedding kelwan

हळूहळू एकत्रित काम करत असताना अमृतालाही शुभंकर आवडू लागला होता. अनेकदा हे दोघे एकत्रित फिरायला जातानाही पाहायला मिळाले. त्यावरून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये साखरपुडा करून या चर्चेवर त्यांनी मौन सोडलेले पाहायला मिळाले. साखरपुड्या नंतर जवळपास चार महिन्यांनी हे दोघेही लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठीची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button