Breaking News
Home / मराठी तडका / शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील ऐश्वर्याची रिअल लाईफ स्टोरी

शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील ऐश्वर्याची रिअल लाईफ स्टोरी

कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाइन मालिकेत ऐश्वर्या हे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना दिसत आहे. शर्वरी आणि शंतनू यांच्या नात्यात दुरावा कसा निर्माण होईल हाच विचार ऐश्वर्याच्या मनात सतत घोंगावताना दिसतो. या कटकारस्थानात शर्वरीच्या आईलाही ती कशा पद्धतीने गुरफटते हे या मालिकेतून दर्शवले गेले आहे. कलर्स वाहिनीवर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या मालिकेची सुरुवात झाली होती. शर्वरी आणि शंतनू या प्रमुख पात्रांची ऑनलाईन ओळख होते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात असे साधारण कथानक असलेल्या मालिकेत ऐश्वर्याच्या येण्याने कसे नवे वळण लागते हे या मालिकेतून दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. आज मालिकेतील ऐश्वर्याचे पात्र साकारणाऱ्या नायिकेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत…

samidha guru actress photo
samidha guru actress photo

ऐश्वर्याचे पात्र साकारले आहे अभिनेत्री “समिधा गुरू” हिने. समिधा ही मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कापूस कोंड्याची गोष्ट या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला महाराष्ट्र राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर गेट वेल सून या नाटकासाठी उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक तीने पटकावले आहे. सोनियाचा उंबरा या मालिकेतून तिने मराठी सृष्टीत आपले पाऊल टाकले असले तरी अवघाची हा संसार या गाजलेल्या मालिकेतील तिची अँग्री यंग वूमनची भूमिका विशेष लक्षवेधी ठरलेली पाहायला मिळाली. देवयानी, कमला, तुजविण सख्या रे, गंध फुलांचा गेला सांगून , अनाहूत, क्राईम पेट्रोल ,पन्हाळा, तुकाराम, लाल ईश्क सारख्या चित्रपट आणि मालिकांमधून ती कायम प्रेक्षकांसमोर येत राहिली आहे. समिधा मूळची नागपूरची घरचे वातावरण कलेचेच त्यामुळे अभिनयाची ओढ तिला सुरुवातीपासूनच होती. समिधाचे वडील ‘सुरेश देशपांडे’ हे नाट्य- चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक तर तिची आई ‘मीना देशपांडे’ या प्रसिद्ध कथ्थक अलंकार, नृत्य शिक्षिका तसेच नाट्यअभिनेत्री त्यामुळे नृत्याचा आणि कलेचा वारसा तिला घरातूनच मिळत गेला.

samidha guru with sister
samidha guru with sister

समिधाची थोरली बहीण ही देखील अभिनेत्री आहे हे बहुतेकांना परिचयाचे नसावे. प्रसिद्ध अभिनेत्री ‘मृणाल देशपांडे’ ही समिधाची थोरली बहीण आहे. पुढचं पाऊल, छत्रीवाली, अग्निहोत्र या मराठी मालिका तसेच बावरा दिल या हिंदी मालिकेतूनही त्या झळकल्या आहेत. नाट्य निर्माते चंद्रकांत लोकरे यांच्याशी मृणाल विवाहबद्ध झाल्या असून त्यांना एक मुलगाही आहे. आमच्या ही च प्रकरण, नांदी, नटसम्राट अशा नाटकांची निर्मिती चंद्रकांत लोकरे यांनी केली आहे. समिधा ही देखील प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील केड्या म्हणजेच अभिनेता “अभिजित गुरू” याची ती पत्नी आहे. अभिजित गुरू हा लेखक म्हणूनही याच सृष्टीत कार्यरत असून आजवर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेसह अनेक मालिकाचे पटकथा आणि संवाद लेखन त्याने केले आहे. ‘दुर्वा’ हे अभिजित आणि समिधाच्या गोंडस लेकीच नाव आहे. आई आणि मावशी प्रमाणेच दुर्वाला देखील अभिनयाची आवड आहे. भविष्यात ती देखील याच क्षेत्रात आल्यास वावगे ठरायला नको…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *