जरा हटके

श्रेयस तळपदे पुन्हा एकदा गाजवणारा बॉलिवूड कंगना बरोबर करणार स्क्रीन शेअर

अभिनेता श्रेयस तळपदे हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. अशात आजवर त्याने मराठी बरोबर हिंदी चित्रपट सृष्टी देखील चांगलीच गाजवली आहे. तर आता श्रेयस पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट साकारण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या याच आगामी चित्रपटाविषयी या बातमीतून जाणून घेऊ. कंगना राणावत अभिनित लवकरच “एमर्जन्सी” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये श्रेयस तळपदे हा देखील एक मोठी भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तो नेमके कोणते पात्र साकारणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकताच या चित्रपटाचा एक टिझर व्हिडिओ आणि कांगनाचा फस्ट लूक रिलीज झाला आहे.

shreyas and pravin tambe
shreyas and pravin tambe

हा चित्रपट भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांची भूमिका कंगना साकारताना दिसेल. कंगनाचा जो फास्ट लूक समोर आला आहे. यामध्ये ती अगदी हुबेहूब इंदिरा गांधी यांच्या सारखी दिसते आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. तसेच चाहते कंगनाला या भूमिकेत पाहून खूप खुश आहेत. कंगनाने गेल्या वर्षी एक पोस्ट शेअर केली होती. तो पोस्ट आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यावेळी तिने साल १९७५ मधील एका वर्तमान पत्राचे एक कत्रन शेअर करत लिहिले होते की, “जगाच्या इतिहासातील या सर्वात नाट्यमय घटना होत्या.आणीबाणी कशामुळे जाहीर झाली होती आणि त्याचे परिणाम काय झाले? या घडामोडींच्या मध्यभागी जगातील सर्वात शक्तिशाली महिला होती. या सर्व घटनांवर एक भव्य चित्रपट बनू शकतो. तर भेटुयात पुढच्या वर्षी.” अभिनेता श्रेयस तळपदे हा सतत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असतो. सध्या तो चित्रपट, टेलिव्हिजन तसेच वेब सिरीज अशी सगळी माध्यमे गाजवत आहे. नुकताच त्याचा ‘कोण प्रवीण तांबे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा भरभरून चांगला प्रतिसाद मिळाला. कंगनाच्या ‘एमर्जन्सी’ चित्रपटात देखील श्रेयस तळपदे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

shreyas talpade wife
shreyas talpade wife

श्रेयस फक्त अभिनेताच नाही तर उत्तम दिग्दर्शक देखील आहे. पोस्टर बॉईज हा गाजलेला चित्रपट श्रेयसने दिग्दर्शित केला होता. तसेच येणाऱ्या काळात श्रेयसने दिगदर्शित केलेला ‘सर कार की सेवा मे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रेयस सध्या ‘आपडी-थापडी’ या मराठी चित्रपटाच्या शुटींगमध्ये देखील व्यस्त असून येत्या ७ ऑकटोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस तळपदेसह मुक्त बर्वे, नंदू माधव, संदीप पाठक आणि नवीन प्रभाकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. श्रेयस माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे देखील चर्चेत असतो. पुष्पाया दाक्षिणात्य चित्रपटासाठी त्याने व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केले होते. यामुळे देखील त्याची खूप चर्चा झाली. आता तो कंगना राणावतच्या एवढ्या मोठ्या चित्रपटात झळकणार असल्याने यातील त्याचे काम पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button