चला हवा येऊ द्या मधील महिला कलाकार श्रेया बुगडे एक उत्तम अभिनेत्री आहे. तुम्ही तिला ह्या पूर्वी अनेक मालिकांत देखील पाहिलं असेलच. चला हवा येऊ द्या मुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. २७ डिसेंबर २०१५ साली तिने निखिल सेठ ह्यांच्याशी लग्न केलं. एका मालिकेदरम्यान दोघांची ओळख झाली होती. निखिल सेठ हा एका मालिकेचा कार्यकारी निर्माता होता. त्यानेच श्रेयाला लग्नासाठी मागणी घातली होती पुढे परिवाराच्या सहमतीने दोघांनी धूम धडाक्यात लग्न केलं. श्रेया सोशिअल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे नेहमीच ती तिचे अनेक फोटो सोशिअल मीडियावर अपलोड करताना पाहायला मिळते.

चला हवा येऊ द्या व्यतिरिक्त तू तिथे मी, माझे मन तुझे झाले, छुत्ता छेडा (गुजराती मालिका), थोडा है, बस थोडे की जरुरत हैं (हिंदी मालिका) अश्या बऱ्याच मालिकांत तिने काम केले आहे. पण अनेकांना हे माहित नसेल कि श्रेया अगदी १०-१२ वर्षांची असताना तिने मीना नाईक दिग्दर्शित आणि डॉ. अनिल बांदिवडकर लिखित “वाटेवरती काचा ग” ह्या नाटकात काम केले आहे. ह्या नाटकात तिच्या सोबत दे धक्का चित्रपटातील अभिनेत्री गौरी वैद्य देखील होती. ह्या नाटकात विशेष म्हणजे एकही पुरुषाचा ह्या नाटकात समावेश नव्हता. अभिनेत्री मनवा नाईक हिच्या आई मीना नाईक ह्यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते शिवाय त्यांनी नाटकात काम हि केलेले पाहायला मिळाले. श्रेयाने मालिकेत मयुरीचे पात्र साकारले होते. अगदी लहान वयात तिने साकारलेल्या ह्या नाटकाची त्यावेळी अनेकांनी स्थुती केली होती. श्रेया हि एक उत्तम अभिनेत्री आहे हे ह्या नाटकातून पाहायला मिळाले. “वाटेवरती काचा ग” हे नाटक तुम्हाला सोशिअल मीडियावरहि नक्कीच पाहायला मिळेल.

चला हवा येउद्या मालिकेत सध्या श्रेया हि एकमेव महिला कलाकार असली तरी तिला सेटवर कधीही एकटं वाटलं नाही. ती सर्वांत मिळून मिसळून राहणारी एक उत्तम कलाकार आहे. आज श्रेयाचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. एका कार्यक्रमात तिने सांगितलं होत कि मी अनेक मालिकांत काम केलं अनेक नाटके केली पण झी वाहिनीच्या चला हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमामुळे तिला खरी ओळख मिळाली. ह्याच श्रेय तिचा पती निखिल ह्याला देखील जात. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत तिला अभिनयासाठी मोकळीक दिली. तो नेहमी मला प्रोत्साहन देतो, माझ्यात खूप कमतरता आहेत पण तो त्यांना जास्त महत्व न देता अभिनयावर भर देऊन आणखीन काम करण्यास प्रेरित करतो. तिच्या आई वडिलांनी देखील तिला खूप सपोर्ट केला आणि त्यामुळेच ती आज इतकी प्रसिद्धी मिळवू शकली.