Breaking News
Home / जरा हटके / शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सोमवारी पहाटे झाले निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सोमवारी पहाटे झाले निधन

महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५ च्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे आपल्या घरी असताना घरात घसरून पडले होते त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात ऍडमिट केले होते. त्यांना निमोनिया देखील झाला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक होती अशी माहिती त्यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली आहे. त्यांचं वय जवळपास १०० वर्ष होत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र जगभरात पोहचवणारे बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

babasaheb purandar with actor amol kolhe
babasaheb purandar with actor amol kolhe

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड हे आहे. फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली आणि दिग्दर्शित देखील केली आहेत. बाबासाहेबांच्या पत्नी निर्मला पुरंदरे या त्यांच्या शिक्षणविषयक कार्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनाही पुण्यभूषण हा किताब मिळाला होता. बाबासाहेबांची कन्या माधुरी पुरंदरे या एक गायिका आणि लेखिका आहेत. बाबासाहेब पुरंदरे तरुणपानापासूनच पुण्यात स्थायिक झाले. भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत त्यांनी विशेष काम पाहिले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहुणे श्री.ग.माजगावकर यांच्याबरोबर ते ’माणूस’मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो.नी.दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

shivshahir babasaheb purandare
shivshahir babasaheb purandare

पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य, शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार जेव्हा जाहीर केला तेव्हा अनेक मराठा जातिधारक संस्थांनी विरोध केला.बाबासाहेब हे एक ललित लेखक असून इतिहाससंशोधक नाहीत. त्यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात चुकीची माहिती दिली असल्याचं त्यांचं मत होत पण प्रत्युत्तर म्हणून पुरंदरे यांच्या योग्यतेचे दाखले घेऊन त्यांच्या समर्थनासाठी अनेक जण मैदानातही उतरल्याने, राजकीय मैदानात सुरू झालेल्या या लढ्याला आता वैचारिक स्वरूप प्राप्त होणार असे दिसू लागले होते. हा पुरस्कार बाबासाहेबांना याआधीच द्यायला हवा होता, असा दावा करणारे एक निवेदन आता पुरंदरे विरोधकांशी सामना करण्याकरिता सज्ज झाले होते. बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्रभूषण या सन्मानाबरोबर दहा लाख रुपयांतले फक्त दहा पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली. त्यांच्या बद्दल लिहावं आणि बोलावं तितकं कमीच आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *