
कीर्तनकार शिवलीला हीचा बिग बॉस सिजन ३ चा प्रवास नुकताच सुरू झाला आणि अनेकांनी तिच्यावर नाराजी दर्शवली. या शोमध्ये विविध क्षेत्रातील स्पर्धकांनी सहभाग दर्शवलेला पाहायला मिळतो आहे. अभिनेता विकास पाटील, स्नेहा वाघ, अविष्कार दारव्हेकर, गायत्री दातार, जय दुधाणे, शिवलीला बाळासाहेब पाटील, सुरेखा कुडची, तृप्ती देसाई, मीरा जगन्नाथ,उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादूस) , मीनल शाह असे अनेक स्पर्धक बिग बॉसच्या घरात नुकतेच दाखल झाले आहेत. या शोमध्ये सहभागी झालेली शिवलीला बाळासाहेब पाटील ही स्पर्धक बिग बॉसच्या घरात राहून भक्तिमय वातावरण निर्माण करणार असं अनेकांचं मत होत.

आता बिगबॉसच्या घरात जाण्याने तिच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर ह्यापुढे कीर्तनकार हे पद लावू नये अशी देखील टीका तिच्यावर होताना पाहायला मिळतेय. नुकतंच तिने तीच मत व्यक्त केलं आहे. ती म्हणते ” मी जेंव्हा ह्या घरात आले तेंव्हा येथील खेळले जाणारे गेम मला नीट समजत नव्हते मला हे समजण्यासाठी बराच वेळ लागला. आता ह्या पुढे मी सर्व गेम मध्ये मी सहभागी होणार आहे. बिगबॉसच घर म्हणजे फक्त भांडण, काड्या, कुचऱ्या एकमेकांना घालून पाडून बोलणे असं अनेकांचं मत आहे पण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. मी ह्या घरात येताना असाच विचार करून आलेय कि मी जोवर ह्या घरात राहील तोवर सर्वाना आपलंस करून घेईल इथला प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठवडाभर जरी ह्या घरात राहिले तरी इथून जाताना सर्वांच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल. ” असं मत तिने व्यक्त केलं. सोशिअल मीडियावर तिच्या ह्या वक्तव्याची तुफान चर्चा होताना पाहायला मिळतेय. खरंच शिवलीला पाटील हि तेथे होणाऱ्या गेम मध्ये आपला सहभाग दर्शवणार असेल तर पुढे काय काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे त्यामुळे ह्या शो ला टीआरपी देखील चांगलाच मिळणार हे दिसून येते.