Breaking News
Home / जरा हटके / बिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण

बिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण

बिग बॉस च्या १६ व्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली त्या गोल्डन बॉय मित्रांनी लक्ष वेधलं ते त्यांच्या अंगावर असलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी. सनी वाघचोरे आणि संजय गुजर यांची एन्ट्री झळाळली असंच म्हणता येईल. दोन्ही स्पर्धक घरात प्रवेश करताच सर्वांनाच धक्का बसला. पाच किलो सोने परिधान केलेल्या दोन स्पर्धकांना पाहून हे दोघे कोण आहेत असा सवाल प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहे. पण हे दोघे शिव ठाकरेच कौतुक करत शिवला सपोर्ट करताना पाहायला मिळाले. चला तर गोल्डन बॉईजबद्दल. दागिन्यांची हौस आणि स्त्रिया हे समीकरण आपल्याला काही नवीन नाही. आजच्या तरूण मुलींनाही दागिन्यांचा सोस नाही तिथे दोन तरूण अंगावर रोज पाच किलो सोन्याचे दागिने घातल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत हे ऐकून भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. अर्थात असे गोल्डन मेन्स समाजात आहेत पण सनी वाघचोरे आणि संजय गुजर ही तिशीच्या उंबरठ्यावरची मुलं अशी सोन्याच्या दागिन्यांच्या प्रेमात कशी काय पडली ही प्रचंड उत्सुकतेची गोष्ट आहे.

shiv thakre and sunny waghchaure
shiv thakre and sunny waghchaure

सनी आणि संजय ही जोडी सोशलमीडिया स्टार आहे आणि त्यांनी गोल्डन बॉय अशी ओळख बनवली आहे. सनीच्या गळ्यातील जाडजूड चेन, बोटातील अंगठया, वडीलांचे, नानांचे नाव लिहिलेलं लॉकेट हे सगळच लक्षवेधी आहे. तर संजय उर्फ बंटीच्या गळ्यातील गोफ, चेन यांचं वजनही नजरेत भरतंय. सनी आणि संजय हे लहानपणापासूनचे मित्र आहे. दोघांनाही लहानपणापासूनच दागिन्यांची आवड आहे. सनी आणि बंटीच्या अंगावर रोज तीन ते पाच किलो सोनं असतं. ही मित्रांची जोडी पुणेकर असून सिनेमांना फायनान्स करण्याचं काम करतात. सनीची बॉलिवूडमध्येही उठबस असून तो सलमान खान, विवेक ओबेरॉय यांच्यासह अनेक सेलिब्रिटींसोबत फोटो झळकवत असतो. सनी आणि संजय यांच्या सोने कलेक्शनमध्ये प्रत्येक प्रकारचा दागिना आहे. जाड सोन्याची चेन, गोफ, अंगठ्या, हिऱ्यांची अंगठी असा ऐवज त्यांच्या अंगावर रोजच्या रोज असतो. दागिन्यांशिवाय सनीकडे तीन मोबाइल फोन आहेत जे सोन्याच्या कव्हरने सजवलेले आहेत. सनीच्या बुटांमध्येही सोन्याचे कलेक्शन आहे. दोघांकडे जॅग्वॉर, बीएमडब्ल्यू अशा आलिशान कार आहे ज्यांच्यावर सोन्याचा मुलामा आहे. दोघांचा चष्माच्या फ्रेमही सोन्याच्या आहेत. आता इतका ऐवज घालून मिरवणार म्हणजे त्यांना अंगरक्षकाचं कव्हरही आलंच. पण सनी आणि संजय जिथे जातील तिथे त्यांचा थाट काही औरच असतो. पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात ह्यांची वडिलोपार्जित जमीन आहे येथेच हे आजही वास्तव्यास आहेत.

golden boys sunny waghchaure and sanjay gujar bigboss
golden boys sunny waghchaure and sanjay gujar bigboss

सनी वाघचोरे आणि संजय गुजर यांची लाइफस्टाइल इतकी हटके आहे ती त्यांची चर्चा थांबतच नाही. व्यवसाय आणि फायनान्सर हे त्यांचं काम आहे पण दागिने ही त्यांची हौस आहे. मॉडेल प्रीती सोनीसोबत सनी रिलेशनशीपमध्ये आहे. त्यामुळे त्यांचेही फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत असतात. सनीचा मोठा भाऊ व्यावसायिक आहे. “जिला गाझियाबाद” या सिनेमात सनीने एक छोटी भूमिकाही केली होती. सिनेमांसह सनीने अनेक हिंदी टीव्ही मालिकांनाही फायनान्स केलं आहे. विवेक ओबेरॉयच्या कर्म इन्फ्रास्टक्चर या कंपनीत सनी पार्टनरही आहे. संजय गुजर उर्फ बंटी हादेखील सोन्याच्या दागिनेप्रेमात काही कमी नाही बरं का. राजकीय नेता असलेला गणेश हा संजयचा मोठा भाऊ आहे. तर सागर हा त्याचा लहान भाऊ आहे. द खतरा, इंडियन आयडॉल या शोसाठी संजयने सनीसोबत फायनान्स केलं आहे. दोनो यारा हे गाणंही या दोघांवर शूट झालं आहे.संजयच्या ऑडी या आलिशान कारवर सोन्याचा मुलामाही आहे. या कारसोबचे अनेकफोटो त्याने सोशलमीडियावर शेअर केले आहेत.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *