मराठी बिग बॉसच्या तुलनेत ह्यावेळी हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. हिंदी बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसले आहेत मात्र आता या घरात प्रेमाचे त्रिकोण आणि चौकोण देखील प्रथमच पाहायला मिळत असल्याने हिंदी बिग बॉसचा शो यावेळी टीआरपी वाढवताना दिसत आहे. यावरून नुकतेच शालीन भनोटला सलमान खानचीच नव्हे तर सुमबुलच्या वडिलांची देखील बोलणी खावी लागली आहेत. सुमबुल शालिनीच्या प्रेमात आहे तर शालीन सौंदर्याला किस करताना दिसला तर टीनाला देखील आय लव्ह यु म्हणत शालीन तिच्या उत्तराची वाट पाहत आहे. मात्र सौंदर्यावर गौतमचे प्रेम असल्याने त्याने शालीनच्या कृत्यावर आक्षेप घेतला यावरून गौतम आणि शालीनमध्ये जोरदार वाद झालेले दिसले.

शुक्रवार की वॉर मध्ये सुमबुलचे वडील तौकिर खान यांनी बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावली होती. अर्थात आपल्या लेकीला आणि शालीनला समज देण्यात यावी याहेतून त्यांनी या घरात प्रवेश केला होता. त्यावेळी शालिनचे कृत्य केवळ प्रेक्षकांचे लक्ष्य वेधण्यासाठी आहे आणि तो प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुमबुलचा वापर करत आहे असा आरोप सुमबुलचे वडील तौकिर खान यांनी शालीनवर लावलेला पाहायला मिळाला. प्रेमाच्या या त्रिकोण, चौकोणाने बिग बॉसच्या घरात वातावरण तापलेले असले तरी सुमबुलच्या वडिलांनी मात्र शिव ठाकरेवर कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. मराठी मुलगा म्हणून शिव ठाकरे बिग बॉसच्या घरात प्रसिद्धी मिळवत आहे. बिग बॉसने दिलेले टास्क देखील तो अगदी शिस्तीत खेळताना दिसला आहे. अब्दु, प्रियांका आणि इतर सदस्यांसोबत तो मजामस्ती करत प्रेक्षकांना आपलेसे करत आहे. काही दिवसांपूर्वी शालीन एक टास्क खेळत असताना शिवने त्याच्या डोक्यावर आणखी ओझं ठेवलं होतं. ते पाहून त्याची मान दुखली असती असे सुमबुल शिवला म्हणाली होती. त्यावेळी तू ह्यात पडू नकोस असे शिव सुमबुलला म्हणाला तेव्हा सुमबुल तिथून रागाने निघून गेली होती. सुमबुलचा हा राग विनाकारण होता असे सुमबुलच्या वडिलांनी स्पष्ट केले.

शीव ठाकरे हा मराठी मुलगा आहे आणि तो त्याच्या कृत्याने ते जाणवून देतो असे म्हणत तौकिर खान यांनी शिवला ‘तू रिअल मराठा आहेस’ अशी उपमा दिली. ‘सुमबुलच्या डोक्यावरून तू हात फिरवलास मला खूप चांगलं वाटलं, एक मोठा भाऊच असं करू शकतो’. असे म्हणत तौकिर खान यांनी शीव ठाकरेवर कौतुकाचा वर्षाव केला. तौकिर खान हे छोट्या पडद्यावर कोरिओग्राफर म्हणून काम करतात त्यामुळे या इंडस्ट्रीत त्यांना चांगले ओळखले जाते. सुमबुलला याच कारणामुळे मालिकेत झळकण्याची नामी संधी मिळाली. इमली मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली. याच प्रसिद्धीमुळे सुमबुल बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. मात्र ती ह्या घरात चुकीच्या पद्धतीने वागत आहे अशी तिच्या वडिलांनी तिला समज दिली आहे. सुमबुलच्या वडिलांनी शिवच्या कृत्याचे केले कौतुक.