news

मानसीच्या वडिलांच्या खऱ्या पत्नीला पाहिलंत ? जय जय स्वामी समर्थ मालिकेत दोघेही करतायेत काम

आयुष्याच्या जोडीदाराची निवड ही त्याच क्षेत्रातील केली जाते तेव्हा एकमेकांना समजून घेण्याची संधी जास्त मिळते. अर्थात अभिनय क्षेत्रात काम करणारी अनेक कलाकार मंडळींनी जोडीदार म्हणून याच क्षेत्राचा मार्ग स्वीकारला आहे. बरेचसे सेलिब्रिटी कपल एकमेकांना सांभाळून घेत आपला संसार सुखाचा करत आहेत. यातील एक कपल पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत असल्याने भलतेच खुश झालेले पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाहच्या थोडं तुझं थोडं माझं मानसीचे वडील संपतराव तुम्हाला आठवत असतील.

actor shailesh korde family
actor shailesh korde family

ही भूमिका अभिनेते शैलेश कोरडे यांनी साकारली होती. या मालिकेव्यतिरिक्त शैलेश कोरडे यांनी लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू तसेच राजा राजीची गं जोडी मालिकेतून प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. राजा राणीची गं जोडी मालिकेत काम करत असताना २०२२ मध्ये त्यांनी अभिनेत्री श्रुती कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधली होती. श्रुती आणि शैलेश दोघे अनेक वर्षे नाटक, मालिकेतून काम करत आहेत. लग्नाअगोदर ८ वर्षे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. पण आता पहिल्यांदाच या दोघांना एकाच मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळत आहे.

shailesh korde and wife in jai jai swami samarth serial
shailesh korde and wife in jai jai swami samarth serial

कलर्स मराठीच्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून दोघेही एकत्र झळकताना दिसणार आहेत. श्रुती कुलकर्णी नोव्हेंबरपासून या मालिकेत काम करत आहेत पण आता या मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होत आहे. ही भूमिका शैलेश कोरडे साकारणार आहेत.”आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या पहिल्या गोष्टी सुंदर आणि खासच असतात.” म्हणत श्रुती यांनी हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांची ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री या मालिकेतकी नक्कीच जुळून येईल अशा त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button