news

सविता प्रभुणे यांची बऱ्याच प्रतीक्षेनंतर मालिकेत एन्ट्री…मुलगी आहे खूपच सुंदर

मराठी सृष्टीत ९० च्या दशकात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अनेक अभिनेत्री आज चरित्र भूमिका साकारताना पाहायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे सविता प्रभुणे होय. सविता प्रभुणे यांचे बालपण महाराष्ट्रातील वाई, सातारा येथे गेले. त्यांचे वडील डॉक्टर होते. मुलीने शिकून डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण अभिनयाची आवड सविता प्रभुणे यांना नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली येथे घेऊन गेली. तिथे त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. सुरुवातीच्या काळात सविता यांनी मराठी रंगभूमीवर काम केले. ऐतिहासिक नाटक महाराणी पद्मिनी, श्री तशी सौ, निष्पाप, तू हो म्हण , चार दिवस प्रेमाचे यासारखी नाटकं त्यांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने गाजवली. छक्के पंजे, खरा वारसदार, कळत नकळत, लपंडाव यासारख्या चित्रपटात त्यानी मध्यवर्ती भूमिका साकारून एक दमदार अभिनेत्री म्हणून नाव कमावले.

savita prabhune in gharoghari matichya chuli
savita prabhune in gharoghari matichya chuli

मला सासू हवी, जावई विकत घेणे आहे या मराठी मालिकांसोबत कुसुम, सारथी, पलछीन, साया, पवित्र रिश्ता, तुझसे है राबता अशा हिंदी मालिकेतही त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या. तेरे नाम चित्रपटात सलमान खानच्या प्रेमळ वहिनीची भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली होती. नुकत्याच त्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत विरोधी भूमिकेत झळकल्या होत्या. या मालिकेमुळे त्यांना प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या मालिकेनंतर जवळपास १ वर्षाने त्या पुन्हा एकदा मालिकेतून दिसणार आहेत. स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून त्या सकारात्मक भूमिका साकारणार आहेत. १८ मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रामासारखा मुलगा आणि सीतेसारखी सून अशा गोड नात्यांनी सजलेल्या या घरात सासूबाईंचीही भूमिका तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे सविता प्रभुणे यांना या भूमिकेसाठी चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

savita prabhune daughter satwika singh
savita prabhune daughter satwika singh

सविता प्रभुणे या खऱ्या आयुष्यात सिंगल मदर आहेत. घटस्फोटानंतर त्यांनी त्यांच्या मुलीचे पालनपोषण जबाबदारीने केले आहे. सात्विका हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. सात्विका शालेय जीवनात एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. तीने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. वॅन हुसेन कॉम्पिटिशन मध्येही मॉडेल म्हणून तिने सहभाग दर्शवला होता. पार्ले टिळक विद्यालयातून तिने शालेय शिक्षण घेतले होते. सात्विकाचे रुद्रेश आनंद सोबत लग्न झाले असून ती तिच्या सुखी संसारात आता छान रुळली आहे. झगमगत्या दुनियेपासून सात्विका खूप दूर असली तरी एका वॉर्नर्स ब्रोस पिक्चर्स या संस्थेसाठी ती काम करते आहे. दिसायला ती अतिशय सुंदर असलेली सात्विका भविष्यात कधी तिला अभिनय क्षेत्रात पाहायला मिळाली तर नवल वाटायला नको.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button