बऱ्याच प्रतीक्षेनंतर या अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री… सावळ्याची जणू सावली मालिकेतून पुन्हा केलं मालिका विश्वात पदार्पण
महेश कोठारे यांची निर्मिती असलेली सावळ्याची जणू सावली ही मालिका झी मराठीवर लवकरच प्रसारित होत आहे. या मालिकेची प्रसारणाची वेळ आणि तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि साईंकित कामत हे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत तर सुलेखा तळवलकर या मालिकेत खलनायिकेची भूमिका निभावताना दिसणार आहेत. या मालिकेला गौरी किरण, विना जगताप, मानसी नाईक यांचीही साथ मिळणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मानसी नाईक पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहे. मानसी नाईक हिने गणपती बाप्पा मोरया, चाहूल २ अशा मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत.
अभिनेता अक्षर कोठारी सोबत मानसी नाईक विवाहबद्ध झाली होती. पण कालांतराने या दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यांनी २०१९ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. अक्षर कोठारी अजूनही सिंगल आहे सध्या तो स्टार प्रवाहच्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तर मानसी नाईक हिने घटस्फोटानंतर धृवेश कापुरीया सोबत दुसरे लग्न केले. लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रापासून दूर होती. पण आता महेश कोठारे यांनी मानसी नाईकला त्यांच्या मालिकेतून पुन्हा एकदा अभिनयाची संधी दिली आहे. सावळ्याची जणू सावली या मालिकेत तिची भूमिका नेमकी काय असणार आहे हे मालिका पाहिल्यानंतरच समजेल.
मध्यंतरी अक्षर कोठारीने २०१९ हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. या वर्षात त्याने मानसी नाईकला घटस्फोट दिला होता. अक्षर कोठारी हा एक उत्तम अभिनेता असून मराठी मालिका सृष्टीतील एक देखणा नायक अशी त्याची ओळख आहे. मानसी आणि अक्षरने लग्नानंतर चाहूल २ या मालिकेत एकत्रित काम केले होते. पण आता हे दोघेही विभक्त होऊन ५ वर्षे लोटली आहेत.