सारेगमप लिटिल चॅम्प रिऍलिटी शो च नवीन पर्व नुकतंच सुरु झालाय. सारेगमप लिटिल चॅम्प मधील बालगायक अगदी सुरेख गाताना दिसताहेत. आधीच्या पर्वातील उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेले गायक आत्ताच्या पर्वाचे जज म्हणून काम पाहत आहेत. जुने आणि नवीन बाल गायक एकत्र आल्याने ह्या शोला नवा रंग चढला आहे. आर्या , कार्तिकी , मुग्धा , प्रथमेश आणि रोहित हे पंचरत्न जज तर तर मृण्मयी देशपांडे हि ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय. आज आपण “राशी पगारे” हिच्या बद्दल जाणून घेणार आहोत…

राशी पगारे पहिल्याच गाण्यात स्केटिंग करताना ” मी आले निघाले… ” गाणं म्हणत तिने प्रेक्षक तसेच जज सर्वांचीच मने जिंकली. राशी पगारे हिला मराठी सोबत अखिल ७-८ भाषेत गाणं गाता येता येत असल्याचं तिने सांगितलं होत. राशी पगारे हि नाशिक ची असून पंकज पगारे ह्यांची ती मुलगी. पंकज पगारे ह्यांना दोन मुली एक राशी आणि दुसरी सृष्टी. ह्या दोघीनींही सूर नवा ध्यास नवा ह्या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेन्ट केलं होत. सृष्टी हि सूर नवा ध्यास नवा ह्या शोमध्ये खूपच गाजली होती. शो च्या टॉप टेन स्पर्धकांना ती गेली होती. पुढे स्वामींनी मालिकेत तिला माधवराव पेशवे ह्यांची पत्नी रमाबाई पेशवे ह्यांची भूमिका साकारायला मिळाली. ह्या मालिकेत सृष्टीने केलेल्या अभिनयाचं खूपच कौतुक झालं होत. दोघी सक्ख्या बहिणी गायिका असून स्टेज वर लाईफ फरफॉर्मन्स देखील करतात. अगदी लहान वयापासून दोघींच्या गाण्याचे अनेक व्हिडिओ त्यांनी सोशिअल मीडियावर शेअर देखील केले आहेत. स्वामींनी मालिकेतील रमाबाईंच्या भूमिकेमुळे सृष्टी पगारे हिला खरी ओळख मिळाली असल्याचं ती सांगते. तर राशी पगारे सारेगमप लिटिल चॅम्प मधून नक्कीच यश मिळवेल असं वाटतेय. राशी आणि सृष्टी पगारे ह्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…
