मराठी तडका

सारेगमप लिटिल चॅम्प मधील ह्या बाल गायिकेची आई आहे प्रसिद्ध गायिका

झी मराठी वाहिनीने पूर्वी एकाहून एक मालिका सादर केल्या आहेत त्यातली सर्वात जास्त चाललेली १२ वर्षांपूर्वीची सिरीज म्हणजे सारेगमप लिटिल चॅम्प. १२ वर्षापूर्वीचे हेच उपांत्य फेरीत पोहचलेले स्पर्धक आता नव्या पर्वातील जज म्हणून काम पाहताना दिसयेत. तर मृण्मयी देशपांडे हि ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय. मागच्या आठ्वड्यात गायलेले स्पर्धक खूपच गाजले सगळीच मुलं उत्तम परफॉर्मंस करताना पाहायला मिळतायेत मागच्या आठवड्यात गायलेलं गाणं हि पोरी साजूक तुपातली हे सगळ्यांनीच डोक्यावर घेतलं.

swara joshi singer
swara joshi singer

इतक्या लहान वयात हावभाव करून उत्तम रित्या गाणं गाणं खूपच अवघड असत पण या पर्वातील सगळीच मुलं आपलं गाणं उत्तम रित्या सादर करताना पाहायला मिळतायेत. ह्या लहानग्या गायिकेचा नाव आहे “स्वरा जोशी”. स्वरा जोशी हि मुंबईची असून मुंबईतील दादर मधील साने गुरुजी इंग्लिश मेडीयम मध्ये ती शिकत आहे. ती आठ वर्षाची असून ३ऱ्या इयत्तेत शिकतेय. स्वरा जोशी हि एक उत्तम गायिका असून ह्यापूर्वीही तिने टीव्ही शो मध्ये गाणे गायले आहे. ह्या पूर्वी ती सोनी मराठी वरील जय जय महाराष्ट्र माझा ह्या कार्यक्रमात बालगायीका म्हणून पाहायला मिळाली होती. ह्या कार्यक्रमात देखील तिने सर्वांचे लक्ष वेधले होते. ह्या व्यतिरिक्त आपल्या आई सोबत तिने अनेकदा स्टेजवर गाण्याचा लाईव्ह शो देखील केला आहे. होय तिची आई देखील एक उत्तम गायिका आहे त्या देखील अनेक कार्यक्रमांत गाणी गाताना पाहायला मिळतात. त्यांच्या बद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्वरा जोशी हिच्या आईच नाव आहे केतकी भावे- जोशी. तर वडिलांचं नाव आहे अभिजीत जोशी तेही संगीत क्षेत्राशी निगडित आहेत.

singer ketki bhave joshi
singer ketki bhave joshi

स्वरा जोशीच्या आई केतकी जोशी ह्या एक उत्तम गायिका असून सोनी मराठी वरील जय जय महाराष्ट्र माझा आणि सिंगिंग स्टार या कार्यक्रमात पाहायला मिळाल्या होत्या. त्याचसोबत अनेक मराठी अल्बम मध्ये देखील त्यांनी गाणी गायली आहेत. “मम्मी कि लोरिया” या अलबम मध्ये सोजा बेटा हे त्यांनी गायलेलं अंगाई गीत खूपच गाजलं. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत स्वरा देखील ह्या क्षेत्रात नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवेल ह्यात शंका नाही. स्वरा जोशी आणि सारेगमप मधील सर्वच बालसिंगरला आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button