आर्यन खानला अटक केल्यापासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत. एवढेच नाही नवाब मलिक यासारख्या राजकीय मंत्र्यांकडून देखील त्यांच्यावर अशा स्वरुपाच्या टीका केलेल्या पाहायला मिळत आहेत. समीर वानखेडे यांची बहीण आणि कुटुंबियांवर देखील त्यांनी वक्तव्य केलेले पाहायला मिळाले. समीर वानखेडे हे कुटुंबासोबत फिरायला जाताना खंडणी गोळा करायला जातात अशी वक्तव्य समोर येत आहेत. या सर्व आरोपांवर समीर वानखेडे यांनी वृत्त माध्यमांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले आहे.

शिवाय जर यामुळे मला जेल होणार असेल तर तीही मी स्वीकारायला तयार आहे देशसेवा करताना मला अटक केली तरी ती मला मान्य असेल असे ते या मुलाखतीत म्हणाले. तर तिकडे समीर वानखेडे यांच्या पत्नी म्हणजेच अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्यावर देखील एका वृत्त माध्यमातून टीका केली गेली. नुकतेच या टीकेला त्यांनी उत्तर दिले असून वृत्त वहिनीला त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. ह्या सर्व गोष्टींमुळे समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एका वृत्त माध्यमातून क्रांती रेडकरचे नाव शीर्षकात घुसडून त्यात त्यांच्यावर आयपीएल मॅच फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले. क्रांती रेडकरबाबत अशी चुकीची माहिती वृत्त माध्यमातून पसरल्याने त्यांनी या वृत्त माध्यमाला खडेबोल सुनावले आहेत. एका ट्विटमध्ये त्या म्हणतात की, ‘फक्त काही व्युव्हज मिळवण्यासाठी तुम्ही जनतेची दिशाभूल करणारं शीर्षक एका बातमीला दिल आहे, हे कशासाठी??…माझी आणि समीर वानखेडे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी, की फक्त पैशांसाठी???’….असा प्रश्न त्यांनी या वृत्त माध्यमाला विचारला आहे..’ मी अगोदरच या खोट्या बातमीप्रकरणी कोर्टात खटला लढवला होता आणि ती केस मी जिंकली देखील होती…तुम्ही दिलेली बातमी मी पूर्ण वाचली आहे…त्यात तुम्ही माझ्याबाबत फक्त ओळखीचं प्रकरण असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

ही अत्यंत चुकीची माहिती दिली आहे. मग तुम्ही हे असं शीर्षक देऊन काय साध्य करणार आहात.. यासर्व गोष्टींमुळे आमची प्रतिमा मलिन करण्याचा विचार केला जात आहे. प्रत्येकजण बातम्या पूर्ण वाचत नाहीत केवळ ठळक शीर्षक देऊन वाचणाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. तुमच्या ह्या दिशाभूल करणाऱ्या लिखाणामुळे आणि निष्काळजीपणामुळे लोक मला ट्रोल करत आहेत. तुमच्या ह्या रंगवलेल्या बातम्या यापुढे अजिबात खपवून घेणार नाही. माझी यात चूक असती तर मी नक्कीच ती मान्य केली असती….मी दोषी मुळीच नाही त्यामुळे आता मी हे सहन करणार नाही…’ अशी रोखठोक प्रतिक्रिया क्रांती रेडकरने दिली आहे. आयपीएल फिक्सिंग प्रकरणी क्रांती रेडकरला काही वर्षांपूर्वी नाहक त्रास सहन करावा लागला होता. या प्रकरणी तिने केस देखील लढली होती. त्यात तिच्याबाजूने निकाल देण्यात आला होता. मात्र अशी बातमी आता मुद्दामहून कोणी रंगवून सांगण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याबाबत मी आता ऐकून घेणार नाही असे स्पष्ट शब्दात तिने सुनावले आहे. बातम्यांना व्हीव्हज मिळावे म्हणून तुम्ही कोणाच्या प्रतिमेला पार धुळीत मिळणार का ? हे का आणि कशासाठी उकरून काढल जात आहे?… यातून लोक आता मला ट्रोल देखील करू लागले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे..