Breaking News
Home / जरा हटके / सैराट फेम प्रिन्सला नाहक त्रास क्लीनचित मिळाली पण या मानहाणीमुळे मला व माझ्या पत्नीला

सैराट फेम प्रिन्सला नाहक त्रास क्लीनचित मिळाली पण या मानहाणीमुळे मला व माझ्या पत्नीला

नागराज मंजुळे यांचा सैराट या अत्यंत गाजलेला सिनेमा .या सिनेमात सूरज पवारने प्रिन्सची भूमिका केली होती. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं खूप कौतुकही झालं होतं. रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांच्याइतकी लोकप्रियता सूरजला या भूमिकेने मिळवून दिली. त्याआधी नागराज मंजुळे यांच्या पिस्तुल्या, फँड्री या सिनेमातही सूरज महत्वाच्या भूमिकेत दिसला. एका सामान्य घरातील सूरजला नागराज मंजुळे यांच्या सिनेमांनी स्टार बनवलं. सैराटनंतर सूरजचा कोणता नवा सिनेमा आला नाही. त्यामुळे सध्या तो काय करतोय याची माहिती त्याच्या चाहत्यांना नव्हती. अचानक सूरज आर्थिक फसवणूक प्रकरणी चर्चेत आला. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत सूरजचं नाव आलं होत. या प्रकरणात फक्त सूरजच नाही तर इतरांचीही नावं सामिल होती. मात्र सूरजने मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप त्याच्यावर लावला होता. नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष या दोघांनी दिलं होतं.

nagraj manjule and suraj pawar
nagraj manjule and suraj pawar

यासाठी ५ लाखांची मागणीही त्याच्याकडून करण्यात आली होती. नोकरी लागल्यावर तीन लाख तर सुरुवातीला २ लाख अशी त्यांची बोलणी झाली होती. पैशांचं पाकीट देण्यासाठी राहुरी इथे महेश गेले तेव्हा त्यांना आपली फसवणुक होत असल्याची चाहूल लागली. यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात केली. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सूरज पवार आणि त्याच्या अन्य साथीदारांना अटक करण्यात आली. हे प्रकरण राज्यभर गाजलं मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सूरज पवारचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांनी सुरजला क्लिनचिट दिली. परंतु या घडनेमुळे सूरज पवारला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. या प्रकरणामुळे आपली बदनामी तर झालीच पण आता जगणेही कठीण झाले आहे असे तो म्हणतो आहे. ‘नमस्कार, मी सुरज पवार,गेली दहा पंधरा दिवसात माझी एवढी मानहानी झाली. किंवा केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सगळ्याच‌ मिडीयांनी माझे एवढे धिंडवडे काढले. तरी पण मी शांत होतो. अखेर मी स्वत: राहूरी पोलीस स्टेशनला हजर झालो. पोलीसांसमोर सर्व कागदपत्रासह माझे म्हणने नमूद केले. त्यानंतर वेळोवेळी राहूरी पोलीस सांगेल त्या दिवशी हजर राहात होतो. पोलीस स्टेशनला पहील्यांदा हजर राहीलो आणि बाहेर मिडीयात ‘प्रिन्सला पोलीसांनी केली अटक ! प्रिन्स खाणार जेलची हवा ! प्रिन्स अखेर जेरबंद ! या अशा मधळ्याच्या बातम्या देवून प्रिंट आणि डिजीटल मिडीयाने, कुठलीही शहानिशा करता माझ्या नावाने महाराष्ट्रभर रान पेटवलं. खरे पहाता राहूरी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत आणि त्यानंतर दाखल झालेल्या असंख्य तक्रारीत तक्रारदारांनी मला फक्त चित्रपटात काम करताना पाहीलं होतं. परंतू प्रत्येक्षात ते मला कधीच भेटले नव्हते. राहूरी पोलीस‌ स्टेशनच्या अधिका-यानी अखेर सर्व तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलवून त्याची खात्री करून घेतली.

actor suraj pawar
actor suraj pawar

तर एकाही तक्रारदारची माझ्या बाबत तक्रार नव्हती. आरोपींनी बचाव हेतून ठेवून माझे नाव घेतले होते हे पोलीसांसमोर सिध्द झालं. पोलीस अधिकारी श्री. दराडे साो आणि श्री. सज्जनकूमार न-र्हेडा आणि पोलीस टिमने सर्व सत्यता पडताळली आणि अखेर माझ्यावर लागलेलं “किटाळ” एकदाचं संपलं. पण यामध्ये झालेली मानहानी हे नुकसान कधी भरून येणारं आहे. माझ्या जवळच्या लोकांचा माझ्यावरील विश्वास या प्रकरणातून उडाला. असंख्य जवळची माणसे आणि नाती माझ्यापासून दुर गेली. पाच महिन्यापूर्वी माझे लग्न झाले अशा आलेल्या बालंटा नंतर माझ्या पत्नी व तिच्या घरच्यांची परिस्थिती न सांगीतलेली बरी. या प्रकरणा नंतर सुखाच्या काळात माझ्या सोबत मज्जा मस्ती करणारे एकही मित्र या पडत्या काळात मदतीला धावली नाही. पण काही जवळचे चार लोकांनी मला धिर देवून या संकटात मदत केली त्यांचा शत:शहा ॠणी आहे..! माझ्यावर आलेल्या संकटात प्रिंट आणि डिजीटल मिडीयाने भरभरून जनतेसमोर सादर केलं पण या प्रकरणातून सहीसलामत सुटल्यानंतर त्याची कुठल्यातरी प्रिंट आणि डिजीटल मिडीयाने, चार ओळीची नोंद सुध्दा घेतली नाही..!’

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *