अन्नपूर्णा विठ्ठल यांनी काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरिवार ही मालिका सोडली होती. मात्र मी ही मालिका स्वतः सोडली नसून माझ्यावर पूर्णपणे दबाव आणला जात होता. मालिकेच्या कलाकारांनी मला पूर्णपणे एकाकी पाडले होते तसेच माझी मानसिक छळवणूक देखील केली होती असा आरोप अन्नपूर्णा यांनी सुनील बर्वे, नंदिता धुरी, किशोरी अंबिये आणि मालिकेच्या दिग्दर्शकाची नावं घेऊन केला होता. ह्याची सुरुवात तेव्हापासून सुरू झाली जेव्हापासून अन्नपूर्णा ह्या अर्धांगवायू झालेल्या लक्ष्मीची भूमिका साकारत होत्या.

वाकडं तोंड करून बोलताना त्यांच्या तोंडातून विचित्र आवाज येऊ लागल्याने सेटवर उपस्थित असलेल्या सुनील बर्वेना आपले हसू आवरले नव्हते. त्याचे असे विचित्र वागणे पाहून अन्नपूर्णा यांनी सुनील बर्वेकडे जाऊन त्यांची समजूत घातली होती तेव्हापासून सुनील बर्वे माझ्या विरोधात वगतो असं अन्नपूर्णा यांनी म्हटलं होतं. त्याच्या जोडीला मालिकेतील बाकीचे कलाकार देखील मला त्रास देऊ लागले होते. अगदी दिग्दर्शकाकडून देखील मला अपमानास्पद वागणूक दिली जात होती असे आरोप त्यांनी मालिकेच्या कलाकारांवर लावले होते. अन्नपूर्णा यांनी सहकुटुंब सहपरिवार ही मालिका ह्याच कारणामुळे सोडली आहे असं त्या म्हणतात आणि माझ्याबाबत काही वाईट घडलं तर हे सर्व कलाकार जबाबदार असतील असंही त्यांनी त्यात म्हटलं होतं. अन्नपूर्णा ह्या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत परंतु मराठी सृष्टीत बाहेरच्या लोकांना टिकून दिले जात नाही त्यांना काहीही करून बाहेर काढण्याचं षडयंत्र रचलं जातं असंही त्या म्हणाल्या. त्यांनी मालिकेच्या कलाकारांवर जे आरोप लावले आहेत त्यातून त्या गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांकडून सहानुभूती मिळवताना दिसत आहेत.

दरम्यान अन्नपूर्णा यांनी मालिकेच्या कलाकारांवर लावलेल्या आरोपांवर अजून कुठल्याही अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिलेली नसली तरी सुनील बर्वे यांनी ह्या आरोपांचे खंडन केलेले पाहायला मिळत आहे. अन्नपूर्णा यांच्या आरोपांवर अभिनेता सुनील बर्वे यांनी नुकतीच मीडियाला एक प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर होणारे आरोप त्यांनी साफ झुगारून लावले आहेत आणि अन्नपूर्णा यांच्याबाबत सुनील बर्वे म्हणाले की, ‘मी अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. परंतु माझ्यासोबत असा प्रकार कधीच घडला नाही. आमच्याबद्दल खोटे पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मालिका सोडण्याचा निर्णय हा सर्वस्वी त्यांचा होता. जेव्हा त्यांनी ही मालिका सोडली तेव्हा आम्हालाही वाईट वाटले होते. परंतु मालिका सोडल्यानंतर त्यांनी हे सगळे आरोप का केले, हे आम्हाला माहित नाही.’