Breaking News
Home / जरा हटके / सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्रीने मानसिक छळ केल्या प्रकरणी केली तक्रार

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्रीने मानसिक छळ केल्या प्रकरणी केली तक्रार

सहकुटुंब सहपरिवार या स्टार प्रवाहवरील मालिकेतील अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल ज्या लक्ष्मीची मुख्य भूमिका साकारत होत्या त्यांनी आपल्या बाबत काय घडलं याचा सविस्तर व्हिडीओ शेअर करून मालिकेच्या टीम विरोधात मानसिक त्रास दिल्याबाबत आणि गैरवर्तवणुकीबाबत एक व्हिडिओ शेअर करून तक्रार नोंदवली केली आहे. अन्नपूर्णा विठ्ठल या मालिकेत आईची भूमिका साकारत होत्या. पण ही भूमिका साकारत असताना त्यांना खूपच त्रास देण्यात आला असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे आणि मला काही झालं तर हे सर्व टीम जबाबदार राहील असंही त्यात त्यांनी म्हटलं आहे.

actress annapurna vitthal
actress annapurna vitthal

मालिकेतून निघून जाण्यासाठी ह्या टीमने जे षडयंत्र माझ्या विरोधात रचले होते ते माझ्यासाठी आजपर्यंतचा खूपच वाईट अनुभव ठरलं आहे. एका व्हिडिओतून त्यांनी मालिकेच्या सेटवर घडलेला सर्व प्रकार रडत रडत सांगितला आहे त्यात अन्नपूर्णा यांनी म्हटले की, मेकअप रूममध्ये नंदिता धुरी आणि किशोरी अंबिए येतात तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की इथे सगळे जण झोपायलाच येतात. ह्यावर अन्नपूर्णा यांनी म्हटलं की इथं कोण झोपायला येत कलावंत स्टुडिओ तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी नाही कोणी तुमच्या खाजगी आयुष्यात का ढवळाढवळ करतं हेच मला समजत नाही. दुसऱ्या दिवशी मला वेगळी भूमिका देण्यात आली तीदेखील त्यांच्या पचनी पडली नाही. मी त्यांच्या विरोधात कम्प्लेन्ट केली तर मालिकेच्या सेटवर टेक्निशियन, कलाकार लोकांकडे जाऊन माझ्याविरुद्ध खूप वाईट सांगितलं गेलं, माझी बदनामी केली गेली. सेटवर मी पूर्णपणे एकाकी पडले होते. मी ज्या महिन्यात मालिका सुरू केली त्या महिन्यात केवळ ५ ते ६ दिवसच मला काम देण्यात आलं. मी पूर्ण वेळ रिकामीच बसत होती तरी देखील मालिकेच्या टीम कडून काम नसल्याचं सांगितलं आणि त्यांनी माझी बदनामी करत म्हटलं की मी फक्त मेकअप करून बसत होते आणि पैसे घेत होते.

sah kutumb sah parivar actors
sah kutumb sah parivar actors

माझा सिन येतो त्यावेळी त्या म्हातारीला बोलवा असं माझ्याबाबतीत म्हटलं जात होतं. मालिकेत अन्नपूर्णा यांना तोंड वाकड करून बोलावं लागत होतं त्यामुळे त्यांच्या गळ्यावर खूप ताण येऊ लागला होता त्यामुळे शूटिंग मध्येच थांबलं तर टीमने माझ्यावर रोष व्यक्त केला मला त्यावेळी सहानुभूती मिळाली नाही तर त्यांचाच ओरडा खावा लागला. सगळ्यांचे २५ ते ३० रिटेक व्हायचे पण माझा एक जरी रिटेक झाला तरी मला डायरेक्टरकडून ओरडा मिळायचा. मी दरवेळी सॉरी म्हणायचे पण माझ्याबाबतीत हे जाणूनबुजून केलं जायचं, मला ह्या मालिकेच्या टीमने खूप दुःख दिलं आहे मी खूप त्रास देखील सहन केला आहे वारंवार माझ्यावर विनाकारण ओरडा देखील पडलेला आहे . मी ह्या सर्व गोष्टी निर्मात्यांना सांगितल्या त्यावेळी त्यांच्याकडून मला सहानुभूती मिळाली आणि तुम्ही खूप चांगल्या अभिनेत्री असल्याचं सांगत त्यांनी मालिका सोडू नका अशी विनंती केली. तेव्हा मालिकेच्या कलाकारांना त्यांनी एकत्रित जमवलं आणि तुम्ही त्यांना टॉर्चर करतात हे खूप चुकीचं असल्याचं सांगितलं. तुम्ही जर एका महिलेला हे सर्व त्रास देत आहेत हे डिसनी पर्यंत पोहोचलं तर आपलं प्रॉडक्शन हाऊस बॅन केलं जाईल , आपली मालिका देखील यामुळे बंद पडू शकते असं म्हणताच इतर कलाकारांना आपली चूक लक्षात आली.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.