news

ह्यातून बाहेर कधी पडणार साडी नसलेला सागर मी कधी बघणार….चला हवा येऊ द्या वर सागर करांडेचं मत

चला हवा येऊ द्या मधून बाहेर पडल्यानंतर सागर कारंडे नाटकाकडे वळला होता. पण मध्यंतरी नाटकाचे अनेक दौरे सुरू झाले त्यामुळे वेळीअवेळी जेवण होऊ लागले. याचा परिणाम त्याच्या शरीरावर होऊ लागला. आणि एक दिवस अचानकपणे नाटकाचा प्रयोग रद्द करून तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. अपचन, ऍसिडिटी यामुळे सागर भयंकर अस्वस्थ होता. तेव्हा त्याला अटॅक आल्याची अफवा पसरली होती. पण अवेळी जेवणामुळे हे घडलं असे त्यानेच समोर येऊन प्रेक्षकांना माहिती दिली. पण यानंतर सागर कारंडे कुठेच दिसत नसल्याने त्याच्या चाहत्यांनी परत चला हवा येऊ द्या मध्ये येण्याची मागणी केली. पण निलेश साबळेच्या हसताय ना हसायलाच पाहिजे या नवीन शो मध्येही तो दिसला नाही. तेव्हा त्यांच्यात काहीतरी बिनसलंय अशी कुजबुज सुरू झाली.

sagar karande in chala hawa yeu dya
sagar karande in chala hawa yeu dya

नुकताच सागर कारंडेचा बाई गं हा चित्रपट रिलीज झाला. यात तो स्वप्नील जोशीच्या मित्राची भूमिका साकारत आहे. त्याचं हे कॅरॅक्टर प्रेक्षकांना आवडतं आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने सागरने त्याच्या मनातली गोष्ट आज बोलून दाखवली आहे. चला हवा येऊ द्या मध्ये सागर कारंडेने अनेक स्त्री पात्र रंगवले होते. पण या सर्वांचा त्याला कुठेतरी कंटाळा वाटू लागला. तो म्हणतो की, ” मी बऱ्याच कार्यक्रमात सतत तेच करत होतो. पण ह्यातून मी बाहेर कधी पडणार असं मला झालं होतं. साडी नसलेला सागर कारंडे मी कधी बघणार?. मला सागर कारंडे अशी ओळख बनवायची होती. पण चित्रपटाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली याबद्दल मी दिग्दर्शक आणि स्वप्नील जोशीचे आभार मानतो. स्वप्नील दादा सोबत मी अगोदर एक चित्रपट केला होता त्यामुळे त्याच्या सोबत काम करायला मला खूप मजा आली. या चित्रपटात मी सागर म्हणूनच काम करतोय आणि प्रेक्षकांनाही माझी भूमिका आवडतेय.” असे तो म्हणतो.

sagar karande with wife
sagar karande with wife

दरम्यान स्त्री भूमिका साकारताना अगोदर खूपच त्रासदायक वाटत असल्याचे तो म्हणतो. कारण साडी नेसणं, पदर सांभाळणं या खुप कठीण गोष्टी आहेत. पण कालांतराने त्याची सवय होत गेली. पण या भूमिका साकारल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला. अगोदर बायकोला आवरायला खुप उशीर होतो म्हणून तिच्या मागे लागायचो पण साडी नेसायला वेळ लागतो हे कळल्यावर मीच आता घाई करणं थांबवलं आहे. माझ्यातला हा सकारात्मक बदल झाल्याने कुटुंबातही वाद, चिडचिड होत नाही अशी कबुलीही तो देतो. पण सागर कारंडेच्या या भूमिकेमुळेच त्याने चला हवा येऊ द्या सोडली का अशी आता चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button