जरा हटके

RRR साठी या कलाकारांनी घेतले इतके मानधन आठवडाभराच्या शूटिंगसाठी अजय आलियाच्या खात्यात कोटय़वधी

कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या आणि आता कोरोना निवळल्यानंतर दणक्यात प्रदर्शित झालेल्या आरआरआर या दाक्षिणात्य सिनेमाचा बॉक्सऑफिसवर गल्लाभरू धुमाकूळ सुरू आहे. राजमौली यांनी बाहुबलीनंतर हा सिनेमा पडदयावर आणला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 22 कोटी रूपये कमाई केली असून चार दिवसात हा गल्ला शंभरकोटींच्या घरात पोहोचला आहे. या सिनेमाच्या कथानकासह भव्यतेची जितकी चर्चा सुरू आहे त्यापेक्षा जास्त चर्चा या सिनेमाच्या बजेटची आणि यातील कलाकारांनी घेतलेल्या तगडय़ा मानधनाची होत आहे. मानधनाचा हा आकडाही या सिनेमाइतकाच भव्य असून कलाकारांच्या मानधनाचा समावेश नसतानाही या सिनेमाच्या निर्मितीसाठी 336 कोटी रूपये खर्च केले आहेत.

rrr movie actors
rrr movie actors

एका मुलाखतीत राजमौली यांनी सांगितलं की 65 दिवस या सिनेमाचे शूटिंग सुरू होते आणि एका दिवसाच्या शूटिंगचा खर्च 75 लाख इतका होता. परदेशी कलाकारांसह फार मोठं युनिट एकत्र होते. दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट २५ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.‘आरआरआर’ हा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही तगडी आहे. साउथचा सुपरस्टार रामचरण हा ‘अल्लूरी सीताराम राजू’ हे पात्र साकारताना दिसणार असून यासाठी रामचरणने 45 कोटी रूपये मानधन घेतले आहे. राम चरणसोबत अभिनेता ज्यूनिअर एनटीआरही चित्रपटात प्रमुखेत असून त्याच्या खात्यावरही 45 कोटी रूपये मानधन जमा झाले आहे. या सिनेमातून बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करत आहेत. फक्त सात दिवसांच्या शूटिंगसाठी अजयला या सिनेमाकरिता 25 कोटी रूपये मानधन म्हणून मिळाले आहेत तर काही मिनिटांच्या एका सीनसाठी आलिया भटने 9 कोटी रोख मोजून घेतले आहेत.

actors in rrr movie
actors in rrr movie

मोठं बजेट आणि सुपरस्टार्स असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक अनेक दिवसांपासून आतुर होते. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये धाव घेतली. सिनेमाचे बहुतांश शो हाऊसफुल्ल झाले आहेत. ज्या प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला त्यांनी सोशल मीडियावर सिनेमाचं भरभरून कौतुक करत मास्टरपीस असल्याचं सांगितलं आहे. देशभरातील ५ हजार स्क्रीनवर आरआरआर सिनेमा रिलीज झाला आहे. उत्तरेमध्ये २ हजार स्क्रीनवर हा सिनेमा दाखवला जात आहे. तेलुगु राज्यांत १ हजार ८०० स्क्रीन, केरळमध्ये ५०० स्क्रीन आणि तामिळनाडूमध्ये १२०० स्क्रीनवर ६० टक्के आरआरआर सिनेमा रिलीज झाला आहे. अजूनही पुढे हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडीत काढताना पाहायला मिळणार असल्याचं दिसून येतंय असो चित्रपटाला आणि कलाकारांना खूप खूप शुभेच्छा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button