Breaking News
Home / जरा हटके / वडील प्रसिद्ध अभिनेते असूनही गश्मीर १५ वर्षाचा असताना मोठं संकट आलं राहत घर देखील बँकेने सील केलं

वडील प्रसिद्ध अभिनेते असूनही गश्मीर १५ वर्षाचा असताना मोठं संकट आलं राहत घर देखील बँकेने सील केलं

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा यापलीकडे स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात गश्मीर महाजनी याने बाजी मारली आहे. लोकप्रिय कलाकाराचा मुलगा असूनही आयुष्यात अनेक चढउतार, यशअपयश यांचे चटके सोसलेल्या गश्मीरने त्याच्या लहानपणी अनेक आवडीनिवडींना मुरड घातली आहे हे खूप कमीजणांना माहिती आहे. सध्या गश्मीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो डान्स महाराष्ट्र डान्स या शोचा परीक्षक म्हणून. यशाच्या शिखरावर असलेली त्याची डान्स अॅकॅडमी, अभिनयातील चांगलं करिअर असा आलेख उंचावत असताना लहान मुलांमधील डान्स टॅलंट दाखवणाऱ्या शोसाठी परीक्षक बनण्याला होकार देण्यासाठी गश्मीरकडे एक खास कारण आहे. या निमित्ताने गश्मीर त्याचं बालपण नव्याने जगणार आहे.

gashmir and ravindra mahajani
gashmir and ravindra mahajani

लहान मुलांमधील नृत्याला वाव देणारा डान्स महाराष्ट्र डान्स हा शो छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोची जाहीरात सुरू होती. सुरूवातीला लहान मुलांना फोकस करून या शोचं प्रमोशन करण्यात आलं. नृत्य आणि जादू असा संगम या शोमध्ये आकर्षित करत आहे. या शोमधील स्पर्धकांची जितकी उत्सुकता होती तितकीच उत्सुकता होती ती परीक्षक म्हणून कोण दिसणार याची. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत अभिनेता, डान्सर गश्मीर महाजनी परीक्षकाच्या खुर्चीवर आहे हे कळताच त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. शो सुरू होण्याआधी गश्मीरने काही डान्स स्टेप करण्याचं चॅलेंजही सोशलमीडियावर दिलं होतं आणि हा ट्रेंड खूपच गाजला. शालेय वयापासूनच गश्मीरला नृत्याची खूप आवड आहे. मायकल जॅक्सन हे गश्मीरचं दैवत आहे. लहानपणी क्लासची फी भरून डान्स शिकणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं म्हणून बहिणीने दिलेल्या नृत्याच्या सीडी बघून गश्मीर डान्स शिकला आहे. आजवर गश्मीरने २५ हजार जणांना नृत्याचे धडे दिले आहेत. त्यावेळी त्याच्या कुटुंबावर कर्ज होतं. पुढे त्यानं ते कर्ज फेडण्यासाठी खूप काम केलं. डान्स महाराष्ट्र डान्स या शोमध्येच गश्मीरने हा किस्सा शेअर केला.gashmir mahajani wife and family
gashmir mahajani wife and family


अभिनयाच्या अनेक संधी समोर असताना, डान्स अॅकॅडमीसाठी भरपूर वेळ देणं गरजेचं असताना डान्स महाराष्ट्र डान्स या शोच्या परीक्षकाच्या खुर्चीने गश्मीरला आकर्षित करण्याचं कारण मात्र खूपच वेगळं आहे. या शोमध्ये डान्स स्पर्धक म्हणून येणाऱ्या मुलांसारखाच गश्मीरही त्याच्या लहानपणी डान्ससाठी वेडा होता. त्यामुळेच पुन्हा एकदा या शोमधील मुलांचं थिरकणं पाहून गश्मीरला त्याचं बालपण अनुभवण्याची इच्छा आहे. या शोसाठी परीक्षक म्हणून ऑफर आली तेव्हा गश्मीरने फक्त आणि फक्त याच गोष्टीसाठी होकार दिला. स्टेजवर नाचणारा बालस्पर्धक मला माझ्या बालपणात नेणार आहे असं म्हणत गश्मीरने या शोसोबत जोडलेलं नातं व्यक्त केलं. गश्मीरबाबत सांगायचं तर तो आधी उत्तम डान्सर आहे आणि मग अभिनेता. डान्समध्येच त्याला करिअर करायचं होतं, आणि अॅकॅडमी सुरू करून त्यानं त्याचं स्वप्नं पूर्ण केलं. कॅरी ऑन मराठा या सिनेमातून त्यानं पदार्पण केलं. वन वे तिकीट, मला काहीच प्रॉब्लेम नाही, देऊळबंद हे त्याचे सिनेमे गाजले. इमली या हिंदी मालिकेतही त्यानं काम केल आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *