अनेक हिंदी कलाकार आपला अभिनय सांभाळत वेगवेगळा व्यवसाय करताना पाहायला मिळत. आता मराठी अभिनेते आणि अभिनेत्री देखील वेगवेगळे व्यवसाय करताना पाहायला मिळतात. मराठी माणसाने व्यवसायात उतरलच पाहिजे असंच अनेकांचं मत. रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेत अत्यंत लोकप्रिय झालेली शेवंता साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने देखील साताऱ्यात आपल्या नव्या व्यवसायाची सुरवात केली आहे. चला तर पाहुयात तिने नेमका कोणता व्यवसायाला सुरवात केलीय ते….

शेवंता साकारणारी अभिनेत्री अपूर्वा बिजनेस वूमन म्हणूनही ओळखली जाते. रात्रीस खेळ चाले मालिकेआधी देखील तिने आपल्या व्यवसायाची सुरवात केली होती. आर्टिफिशिअल ज्वेलरी विकण्याचा तिचा व्यवसाय आहे. मात्र आता शाहूपुरी , सातारा येथे नुकतेच “अपूर्वा कलेक्शन” नावाने साड्या विकण्याचा व्यवसाय तिने सुरू केला आहे.दोन दिवसांपूर्वीच तिने आपल्या या व्यवसायाचे उदघाटन करून ही बातमी चाहत्यांना कळवली आहे. या ठिकाणी नागरिकांसोबत अपूर्वा आणि तिची आई देखील उपस्थित होती .अपूर्वाचे साडी कलेक्शन पाहण्यास आणि त्या साड्या खरेदी करण्यास गिऱ्हाईकांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली होती. सातारा येथील शाहूपुरी रोडवर शुक्रवार पेठ आहे. तेथील सरस्वती कॉम्प्लेक्स मध्ये तिने आपले हे प्रशस्त असे साड्यांचे दुकान थाटले आहे. “अपूर्वाजकलेक्शन” या नावाने तिची स्वतःची वेबसाईट आहे. ह्या वेबवर तुम्हाला तीच वेगवेगळं कलेक्शन पाहायला मिळतं शिवाय तेथे त्याच्या किमती देखील नमूद केलेल्या पाहायला मिळतात. नव्या काळातील नवी बिजनेस पद्धत तिने अमलात आणलेली पाहायला मिळतेय. तिच्या ह्या हटके व्यवसायाला आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा..