रात्रीस खेळ चाले ३ मालिकेच्या कथानकाचा हळूहळू उलगडा होताना दिसत आहे. नुकतेच मालिकेत अभिराम आणि त्याची पत्नी या दोघांची एन्ट्री झालेली आहे. मात्र यावेळी अभिराम त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत दिसल्याने ही अभिनेत्री कोण? याची चर्चा पाहायला मिळत आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वात अभिरामच्या लग्नाची लगबग पाहायला मिळाली होती. आता तिसऱ्या पर्वात अभिरामने आपल्या पहिल्या पत्नीला डिव्होर्स दिला असल्याचे त्याने माईला सांगितले आहे. एकाच कंपनीत काम करत असताना आमच्या दोघांची ओळख झाली आणि आम्ही लग्न केले असे अभिराम माईला सांगतो.

त्याचसोबत तो वाड्याची झालेली दुरावस्था पाहून डागडुजी करण्यास सांगतो. इथेच अभिरामची पत्नी अभिरामला अण्णांच्या खोलीत जाण्याचा आग्रह करते. आज ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… अभिरामच्या पत्नीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “भाग्या नायर” हिने. भाग्या नायरची ही पहिलीच मालिका आहे परंतु हो तिच्या युट्युब चॅनलवरील व्हिडिओजना प्रेक्षकांकडून आजवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून “इट सच” या युट्युब चॅनलच्या माध्यमातून सुमित चव्हाण आणि भाग्या नायर ही जोडी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे काम करत आहे. भाग्या म्हणते की माझी मराठी फारशी चांगली नाही परंतु या वेबसिरीजच्या व्हिडिओसाठी तिने मराठी शिकण्याचे ठरवले. तिच्या तोडक्या मोडक्या मराठी वाक्यांना व्हीवर्स कडून चांगला प्रतिसाद मिळाल्याची पावती नेहमीच तिला सोशल मीडियावरुन मिळताना दिसते. त्यामुळे भाग्याचे मराठी कम दाक्षिणात्य बोलणे रसिकांनी आपलेसे केलेले दिसत आहे. याचाच फायदा तिला रात्रीस खेळ चाले३ या मालिकेतून आता होताना दिसून येतो. दाक्षिणात्य बोलीभाषा अवगत असल्यामुळे तिची ही भूमिका तिच्यासाठी खूपच खास ठरलेली पाहायला मिळते आहे. भाग्या नायर हिला रात्रीस खेळ चाले३ मालिकनिमित्त खूप खूप शुभेच्छा…