
रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वात शेवंताची भूमिका निभावणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर मालिकेतून एक्झिट घेत आहे. अपूर्वाने तिच्या अभिनयाने गाजवलेली शेवंता प्रेक्षकांच्या मनात उतरली होती. मात्र इथून पुढे ती या मालिकेत दिसणार नसल्याने प्रेक्षकांना धक्का बसला आहे. अपूर्वा नेमळेकर शेवंताच्या भूमिकेमुळे खूपच लोकप्रिय झाली होती मात्र मालिकेच्या सिकवल मधून तिच्या भूमिकेबाबत थोडीशी शंका प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाली होती.

या पर्वात तिच्या भूमिकेला पुरेसा वाव देखील मिळत नसल्याचे चित्र दिसत होते त्यात भर म्हणून की काय आता प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून वच्छीची एन्ट्री करण्यात आली आहे. त्याचमुळे अपूर्वाने ही मालिका सोडली आहे का? असा प्रश्न आता मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. आणि म्हणूनच की काय अपूर्वा आता यापुढे मालिकेत दिसणार नाही हे समोर आले आहे. मात्र तिने रंगवलेली शेवंता आता कोणती अभिनेत्री साकारणार ह्याचा उलगडा देखील झालेला दिसतो आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या तिसऱ्या पर्वात शेवंताची भूमिका साकारत आहे अभिनेत्री “कृतिका तुळसकर” . कृतिकाने शेवंताच्या भूमिकेतला एक फोटो शेअर केला आहे त्यात ती अपूर्वा नेमळेकरप्रमाणे नजर रोखताना पाहायला मिळत आहे. अपूर्वाने साकारलेली शेवंता आता कृतिका निभावणार असल्याने तिच्यावर आता ही मोठी जबाबदारी असलेली दिसते आहे कारण अपूर्वाइतकी ती या भूमिकेला न्याय देईल का हे येत्या काही काळातच लवकर स्पष्ट होईल. तूर्तास कृतिका तुळसकर कोण आहे ते जाणून घेऊयात…

.कृतिका तुळसकर ही नाट्य, चित्रपट अभिनेत्री आहे. पाशबंध, गर्ल्स, हाजर, विजेता या चित्रपटात ती झळकली आहे. उलट सुलट, लग्न बंबाळ ह्या नाटकातूनही ती महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. लग्न बंबाळ हे नाटक तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं आहे . या नाटकातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. रात्रीस खेळ चाले३ या मालिकेत कृतिका शेवंताच्या भूमिकेत दिसणार आहे ही तिच्यासाठी आव्हानात्मक भूमिका असणार आहे कारण अपूर्वाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं आणि आता अपूर्वाच्या जागी दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीला स्वीकारण्यास प्रेक्षक लवकर तयार होणार नाहीत हे स्पष्ट आहे त्यामुळे कृतिका हे आव्हान कसे पेलते हे येत्या काही दिवसातच कळेल. तूर्तास शेवंताच्या भूमिकेसाठी कृतिका तुळसकर हिचे अभिनंदन आणि शुभेच्छा!…