Breaking News
Home / जरा हटके / रात्रीस खेळ चाले ३ मधील एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘सयाजी’ नक्की आहे तरी कोण?

रात्रीस खेळ चाले ३ मधील एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘सयाजी’ नक्की आहे तरी कोण?

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचे कथानक हळूहळू उलगडताना दिसत आहे. मालिकेच्या सुरुवातीच्या दोन्ही पर्वाला साधर्म्य साधत नव्या कलाकारांना यातून अभिनयाची संधी देण्यात आली आहे त्यामुळे या कथानकाबाबत काहीसा संभ्रम प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. परंतु काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता हळूहळू मालिकेतून अगोदरच्या कलाकारांनीही एन्ट्री घेतलेली दिसून येते. विशेष म्हणजे सुसल्या , कावेरी ही नवी पात्रे प्रेक्षकांनी आपलीशी केली असली तरी माई, माधव, अभिराम, पांडू, दत्ता, सरिता यांची जादू काही कमी झाली नाही यात मुख्य बाब म्हणजे शेवंता आणि अण्णा नाईकांची एन्ट्री एका विशिष्ट पद्धतीने रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

mahesh phalke actor
mahesh phalke actor

अण्णा नाईक हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट सयाजी आणि मालिकेची सर्वेसर्वा असलेली शेवंता कावेरीच्या मार्फत प्रेक्षकांच्या समोर येत आहे. लवकरच या गोष्टीचा उलगडा होईल पण तुर्तास या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या या दमदार कलाकारांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… कावेरीची भूमिका भाग्या नायर या नवख्या अभिनेत्रीने साकारली असून ही तिची पहिलीच टीव्ही मालिका आहे. ‘ itsuch’ आयोजित वेगवेगळ्या वेबसिरीजच्या माध्यमातून भाग्या नेहमीच प्रेक्षकांसमोर आली आहे. यातून तिच्या दाक्षिणात्य कम मराठी भाषेला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे. तर मालिकेतील एन्काऊंटर स्पेशालिस्ट सयाजीची भूमिका साकारली आहे अभिनेता महेश फाळके याने. महेश फाळके मूळचा ठाण्यातील शहापुरचा. कॉलेजमध्ये असताना अनेक छोट्या मोठ्या एकांकिकामधून अभिनय साकारण्याची संधी मिळाली. महेशने झी मराठीवरील ‘जय मल्हार ‘ या गाजलेल्या मालिकेत रंग्याची भूमिका साकारली होती या भूमिकेनंतर महेश कोठारे यांच्याच ‘विठू माऊली’ मालिकेसाठी ऑडिशन दिली यात कलीची भूमिका साकारण्याची नामी संधी त्याला मिळाली. ही विरोधी भूमिका त्याने त्याच्या अभिनयाने चांगलीच रंगवलेली पाहायला मिळाली होती. या भूमिकेमुळे महेशसोबत एक घडलेला किस्सा आहे त्याबाबत सांगताना तो म्हणतो, एकदा मित्राच्या घरी जेवायला गेल्यावर तिथे असणाऱ्या आज्जींनी त्याला झिडकारलं ‘एखाद्याला किती तरास द्यायचा, त्या पुंडलिकाच्या किती माग लागलाय, किती तरास द्यायचा’ असं त्या रागान म्हटल्यावर ‘मी अभिनय करतो’ असे म्हणून त्यांची समजूत घातली . प्रेक्षकांकडून माझ्या अभिनयासाठी मिळालेली ही पावती आहे असे मी समजतो. रात्रीस खेळ चाले ३ मालिकेत तो इन्स्पेक्टर सयाजीच्या भूमिकेत दिसत आहे. आणखी एक दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने या भूमिकेबाबत महेश खूपच उत्सुक आहे या भूमिकेसाठी महेश फाळके या कलाकाराला खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *