
रंग माझा वेगळा या मालिकेने गेल्या वर्षभरापासून टीआरपीच्या स्पर्धेत पहिल्या तीनच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. मालिका यशस्वी होण्यासाठी बालकलाकारांचा देखील तितकाच मोठा वाटा असतो असे चित्र साध्याच्या घडीला पाहायला मिळाले आहे. मालिकेतील बालकलाकार साइशा भोईर हिने ही मालिका सोडली असल्याचे जाहिर करताच प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दर्शवली होती. मालिकेत साइशा नसेल तर इथून पुढे मालिका पाहण्यात मज्जा नाही अशी प्रतिक्रिया या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिली होती. मात्र शाळेच्या कारणास्तव साइशाने मालिका सोडली असल्याचे कळताच चाहत्यांनी तिच्या या निर्णयाचे स्वागत केलेले पाहायला मिळाले.

मालिकेमुळे साइशा खूपच व्यस्त होती. दिवसाचे १० ते १२ तास शूटिंग करून झाल्यावर रात्री १० वाजता तिचे पॅक अप होत होते त्यामुळे अभ्यास करायला तिला वेळच मिळत नव्हता. साइशा आता दुसरी इयत्तेत शिकत आहे. त्यामुळे तिला आता शाळेचा अनुभव घेण्याची ईच्छा आहे. शाळेत मित्र ती खूप मिस करत होती तिच्या याच इच्छेची दाखल तिच्या पालकांनी घेतली आणि म्हणूनच साइशा ही मालिका सोडत असल्याचे जाहीर करण्यात आले. साइशाने ही मालिका सोडली असल्याने आता कार्तिकीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न या मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे मात्र या गोष्टीचा आता लवकरच उलगडा झाला आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून कार्तिकीचे पात्र खूप महत्वाचे मानले गेले. तिच्यामुळे कार्तिक आणि दीपा आपले आई वडील आहेत याचा उलगडा होत गेला. या दोघांना एकत्र आणण्यासाठी ती नेहमीच धडपड करताना दिसली होती. त्यामुळे ही भूमिका तितकीच महत्वपूर्ण मानली जात होती. आता ही भूमिका बालकलाकार ‘मैत्रेयी दाते’ निभावणार असल्याचे निश्चित झाले आहे.

मैत्रेयी दाते हिने या मालिकेत येण्याअगोदर व्यावसायिक जाहिरातींमधून बालकलाकार म्हणून काम केले आहे. शालेय शिक्षणासोबत मैत्रेयी नृत्याचे देखील धडे गिरवत आहे. चित्रकलेची देखील तिला विशेष आवड आहे. ही आवड जोपासत असतानाच मैत्रेयीने काही बालनाट्यातून अभिनय साकारला आहे. रंग माझा वेगळा ही मालिका मैत्रेयीसाठी खूपच खास ठरणार आहे. साइशा प्रमाणे मैत्रेयी देखील कार्तिकीची भूमिका तिच्या निरागस अभिनयाने उत्तम निभावेल अशी आशा आहे . मालिकेच्या सेटवर मैत्रेयी आणि स्पृहा दळी या बलकलाकारांची आता चांगली मैत्री जुळली आहे. प्रेक्षकांना देखील मैत्रेयीला कार्तिकीच्या भूमिकेत पाहायला नक्कीच आवडणार आहे. या भूमिकेसाठी मैत्रेयीला खूप खूप शुभेच्छा!