
रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिक आयेशाच्या प्रेमात आहे आणि त्यांना लग्न करायचं आहे असे आयेशाची आई देशमुखबाई सौंदर्याला सांगत असते. कार्तिक आणि आयेशा हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत येत्या काही भागात ते दोघे लग्न करणार याचेही उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे परंतु तुर्तास ही मालिका लवकरच लीप घेणार आहे. मालिका काही काळ पुढे लीप घेतलेल्याने कार्तिक आणि दिपाच्या मुली थोड्या मोठ्या दाखवण्यात येणार आहेत. नुकताच या मालिकेचा प्रोमो पाहिला गेला त्यात या दोन्ही मुली एकत्र खेळताना दिसल्या मात्र त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत हे अजूनही त्यांना कळलेले नाही.

मालिकेत कार्तिक ‘दीपिकाचा’ सांभाळ करतो आहे तर दीपा ‘कार्तिकी ‘ चा सांभाळ करताना दिसत आहे. या दोन्ही मुलींमुळे दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र येतील का ह्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. मालिकेत चिमुरड्या कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात… मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे “साईशा भोईर”. साईशा भोईर ही चाईल्ड मॉडेल आहे. काही नामांकित ब्रँड साठी तिने रॅम्पवॉक केले आहे. साईशा आणि तिचे कुटुंब कल्याणला वास्तव्यास आहे. तिचे वडील विशांत भोईर यांना म्युजिकची आणि ट्रॅव्हलिंगची आवड आहे. साईशा युट्युब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर नेहमी आपले व्हिडीओज अपलोड करत असते. तिच्या या वेगवेगळ्या व्हिडिओजना चाहत्यांकडून मोठी पसंती देखील मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नृत्य, अभिनय याशिवाय साईशा कुकिंग करतानाचे व्हिडीओज देखील अपलोड करताना दिसते. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एका व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्यात आला होता त्यात साईशा महत्वाची भूमिका साकारताना दिसली होती. साईशाची आई पूजा कदम भोईर आपल्या लेकीला नेहमीच प्रोत्साहन देताना दिसते. याचमुळे साईशा कला क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. सोशल मीडिया स्टार बनलेली साईशा लवकरच आपल्या पहिल्या वहिल्या मालिकेतून अभिनय साकारताना दिसणार आहे. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतून साईशा दिपा आणि कार्तिकची मुलगी कार्तिकीची भूमिका साकारताना दिसणार आहे. कार्तिकीला सांभाळण्याची जबाबदारी सध्या दिपाने स्वीकारली आहे. कार्तिकी आणि दीपिका यांच्यामुळे त्यांचे आई वडील पुन्हा एकत्र येणार का हे पाहणे आता रंजक होणार आहे. तुर्तास या पहिल्यावहिल्या मालिकेनिमित्त साईशा भोईर हिला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन…