कलर्स वाहिनीवर “डान्स दिवाने सिजन 3” हा रियालिटी शो प्रसारित केला जात आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. याच शोमध्ये स्पर्धक असलेली पल्लवी तोळे आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. ही पल्लवी तोळे नेमकी आहे तरी कोण याबाबत अधिक जाणून घेऊयात… पल्लवी तोळे ही डान्सर आहे तसेच बॉलिवूडमधील बऱ्याच नामवंत कोरिओग्राफरच्या हाताखाली तिने असिस्टंट म्हणून काम केले आहे. डीआयडी सुपर मॉम्स सिजन 2 मध्ये तिने पार्टीसिपेट केले होते.

या शिवाय आजवर वेगवेगळ्या स्टेजवरून तिने आपल्या नृत्याची अदाकारी सादर केली आहे. सह्याद्री वाहिनीच्या दम दमा दम सिजन 2 चे सुत्रसंचालनही तिने केलेले होते. पल्लवीला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. आपली आणि आणि बहिणीच्या प्रेरणेनेच ती आजवर हे यश गाठू शकली आहे. कथ्थक आणि फोक डान्समध्ये तिने प्रशिक्षण घेतले. शालेय, आंतरशालेय स्पर्धांमधून ती नेहमीच सहभागी व्हायची. कॉलेजमध्ये गेल्यावर आर्थिक चणचण भासू लागली त्यामुळे नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत नोकरीचा शोध घेतला यातून तिला तिच्या एका मैत्रिणीने डान्ससाठी ऑडिशन द्यायचा सल्ला दिला. पल्लवीने त्यानंतर कधी मागे वळून पाहिलेच नाही. अनेक मोठमोठ्या स्टार्सच्या कोरिओग्राफर्ससोबत तिला काम करण्याची संधी मिळाली यातून सिनेडान्सर असोसिएशनची ती मेम्बर बनली. प्रसिद्ध कोरिओग्राफर, ऍक्टर “विठ्ठल पाटील” यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. विठ्ठल पाटील यांनी सोनी मराठीवरील “सुपर डान्सर महाराष्ट्र” या शोमध्ये परीक्षकाची भूमिका बनवली होती याशिवाय काही जाहिराती, विरप्पन सारखी वेबसिरीज त्यांनी अभिनित केली आहे. रिंगण चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

पल्लवी तोळे ही मराठी हिंदी मालिका अभिनेत्री “शाल्मली तोळे” हिची बहीण आहे. शाल्मलीने ‘एकतर्फी प्रेम ‘ या नाटकातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. “अवघाची हा संसार” ही तिने अभिनित केलेली पहिली मराठी मालिका. गोजिरवाण्या घरात, या सुखांनो या, हा खेळ सावल्यांचा, दुर्वा, स्वराज्यरक्षक संभाजी या मराठी मालिकांसोबतच चुपके चुपके, श्री या हिंदी मालिका अभिनित केल्या आहेत. “मैं हुं ना” या हिंदी चित्रपतासोबतच “एका पेक्षा एक जोडीचा मामला” रिऍलिटी शोमधून शाल्मलीने आपल्या नृत्याची झलक दाखवून दिली आहे. रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेतून लावण्याची भूमिका ती साकारत आहे. शाल्मली आणि पल्लवी या दोघी सख्ख्या बहिणी आहेत आणि त्या आपापल्या क्षेत्रात चांगले काम करत आहेत ही बाब बहुतेकांना माहीत नसावी. तुर्तास पल्लवीला डान्स दिवाने शोमध्ये चांगले यश मिळो हीच सदिच्छा…