रंग माझा वेगळा या मालिकेतील अभिनेत्रीने दिली गुड न्यूज म्हणते “मी आत्या झाले मुलगा झाला हो”

रंग माझा वेगळा या मालिकेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार आपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देतात. त्यामुळेच ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये नंबर एकवर आहे. अशात या मालिकेतील अभिनेत्री अनघा भगरे आई झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अनघा भगरे ही प्रसिद्ध अतुल भगरे गुरुजींची मुलगी आहे. तिने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. अशात ती आई झाल्याची बातमी सध्या खूप चर्चेत आहे. खरंतर अनघा अजून अविवाहित आहे. मग तरी देखील ती आई कशी झाली? आणि असे अनेक प्रश्न नेटकरी तिला विचारत आहेत. त्यामुळे तिच्या बद्दल सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चेचा आम्ही शोध घेतला. आणि आमच्या हाती तिची एक पोस्ट लागली. यामध्ये ती तिच्या मित्राला शुभेच्छा देत आहे. अनघा नाही तर तिचा मित्र बाबा झाला आहे.

तिच्या मित्राला बाळ झल्यामुळे तिने ती पोस्ट शेअर केली आहे. आणि ती यामध्ये “प्रतीकला मुलगा झाला हो” असं म्हणत आहे. अनघा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपल्या चाहत्यांबरोबर अनेक बोल्ड आणि हॉट लूकमधले फोटो शेअर करते. अशात तिच्या हॉटनेसमुळे अनेकदा तिला ट्रोल देखील केलं आहे. पण आपल्या ट्रोलर्सना देखील ती सडेतोड उत्तर देते. अशात तिचे वडील एवढे मोठे महाराज आणि तरी देखील तिने अभिनय हे क्षेत्र निवडल्याने देखील कानेकांनी तिच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या होत्या. अशात रंग माझा वेगळा या मालिकेतून आज ती घराघरात पोहचली आहे. तिच्या अभिनयामुळे तिला अनेक अन्य मालिकांमधून देखील ऑफर येत आहेत. अनघा मूळची नाशिकची. नाशिकमध्येच तिचा जन्म झाला. तिचं बालपण देखील तिकडचं आहे. अनघा तिच्या लव लाईफमुळे देखील चर्चेत असते. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव सिद्धार्थ बोडके आहे. सिद्धार्थ बरोबर देखील ती अनेकदा फोटो शेअर करते. रंग माझा वेगळा या मालिकेत ती श्वेता हे पात्र साकारते. श्वेता हे एक विरोधी पात्र आहे. मालिकेत सतत ती दीपाला त्रास देताना दिसते. सुरुवातीला मालिकेमध्ये ती अनेक सौंदर्याच्या स्पर्धांमध्ये विजयी झाल्याचे दाखवले होते.