रंग माझा वेगळा या मालिकेत श्वेताची भूमिका अभिनेत्री अनघा भगरे हिने साकारली आहे. अनघा ही भगरे गुरुजींची मुलगी आहे. झी मराठी वाहिनीवरील वेध भविष्याचा या शोमध्ये अतुल भगरे गुरुजी भविष्य सांगताना दिसतात. तसेच त्यांनी काही काळ घेतला वसा टाकू नको या मालिकेत मार्गदर्शनदेखील केले होते. त्यामुळे भगरे कुटुंब क्लासृष्टीला चांगलेच परिचयाचे झाले आहे. परंतु काल सोमवारी ९ मे रोजी अनघाच्या काकांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे भगरे कुटुंबावर एक शोककळा पसरलेली पाहायला मिळत आहे.

खूप लवकर गेलास रे…अशा शब्दात तिने भावनिक होऊन आपल्या काकांसोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. भैय्याकाकांच्या आठवणीत अनघाने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.९/५/२०२२ खूप लवकर गेलास रे. तू काका नाही मित्र होतास माझा. आपल्या खूप पार्टीज पेण्डिंग आहेत. “अॅना, मला मुलगी नाही त्यामुळे तुझ कन्यादान मीच करणार “ हे सतत सांगायचास. स्वतःच्या मुलीसारखाच मला खुप प्रेम दिलस. नेहमी भेटलो की वरण तूप पोळी चा बेत करायचो. कारण काका पूतणी ची आवड अगदी सेम. स्वतःच्या आनंदासोबातच स्वतःची दुःख अगदी मोकळेपणाने शेअर करायचास. तू शिकवलस नेहमी आनंदी कस रहायच. कहिही झाल तरी ग्राउंडेड रहायच. मोठयांचा आदर करायचा. I’m going to miss you terribly.’ काकांच्या निधनाने अनघा खूपच भावुक झाली आहे तिच्या पोस्ट वरून काका आणि तिच्यातलं नातं किती निरागस आणि घट्ट होतं हे समजतं. अनघाचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले ते ओघानेच या क्षेत्रात तिचे येणे निश्चित नव्हते.

रंग माझा वेगळा या मालिकेत येण्याअगोदर अनघाने कोठारे व्हिजनमध्ये मॅनेजर पदावर काम केलं होतं. याशिवाय किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तिने काम केले होते. त्यावेळी अभिनय क्षेत्रात येण्याचं तिने काहीच ठरवलं नव्हतं अशातच मालिकेसाठी सहज म्हणून एक ऑडिशन दिली आणि श्वेताच्या भूमिकेसाठी तीचे सिलेक्शन झाले. श्वेताची भूमिका विरोधी आहे त्यामुळे प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार हे अनघाला ठाऊक होते. खरं तर हीच आपल्या अभिनयाची पावती ठरत असल्याने तिने ही भूमिका स्वीकारण्याचे निश्चित केले. रंग माझा वेगळा मालिकेतून श्वेताच्या भूमिकेमुळे अनघा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली.