गेल्याच वर्षी ‘रामायण ‘ ही मालिका दुर्दशन वाहिनीवर पुनःप्रक्षेपीत करण्यात आली होती त्यामुळे बहुतेकांना ही मालिका आणि त्यातील कलाकार चांगलेच परिचयाचे बनले होते. अर्थात ही मालिका ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय मालिका ठरली होती त्यामुळे आताच्या पिढीला देखील या मालिकेचा चांगलाच परिचय झाला होता. मालिकेत रावणाची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते “अरविंद त्रिवेदी” यांचे नुकतेच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. अरविंद त्रिवेदी याचे काल ५ ऑक्टोबर २०२१ रोजी ९.३० वाजता आपल्या राहत्या घरी वयाच्या ८२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. कांदिवली येथे ते वास्तव्यास होते. नलिनी त्रिवेदी या त्यांच्या पत्नी आणि त्यांना तीन मुली आहेत.

८ नोव्हेंबर १९३० रोजी इंदोर येथे त्यांचा जन्म झाला होता. सुरुवातीला गुजराथी चित्रपटातून त्यांनी अभिनय साकारला होता. रामायण मालिकेत रावणाच्या भूमिकेसाठी त्यांची निवड करण्यात आली होती. ती त्यांनी तितक्याच सहजतेने प्रेक्षकांच्या मनात उतरवली होती. त्यांच्या अभिनयातून रावणाचा दरारा अधिकच खुलत गेलेला पाहायला मिळाला होता. मागच्याच वर्षी रामायण मालिकेच्या पुनःप्रसारणा निमित्त त्यांची आठवण काढली गेली. अरविंद त्रिवेदी मुंबईतच वास्तव्यास असल्याचे समजले होते मात्र त्यांची प्रकृती खालावलेली देखील दिसत होती. स्वतःला टीव्हीवर पुन्हा एकदा पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील वाहू लागले होते. मालिका हिंदी चित्रपट गुजराथी चित्रपट अशा विविध भाषिक चित्रपटातून काम करत असताना त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे ७ पुरस्कार मिळाले होते. रामायण मालिकेतील रावणाची भूमिका गाजवण्या अगोदर ते विक्रम और वेताळ मालिकेतून योगीच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. याशिवाय विश्वमित्रा मालिकेत त्यांनी त्रिशंकूची भूमिका बजावली होती. पराया धन, आज की आवाज, जंगल में मंगल यासारख्या हिंदी चित्रपटात आणि जेसल तोरल सारख्या काही मोजक्या गुजराथी चित्रपटातून त्यांनी अभिनय साकारला होता. रामायण मालिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत झाला होता. १९९१ साली संसदेचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले होते. याशिवाय सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) च्या प्रमुख पदावर कार्यरत होते. साधारण एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी ह्या संस्थेचे कामकाज सांभाळले होते.

रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी एका पोस्ट मध्ये त्यांना आदरांजली वाहिली आहे. माझा मित्र गेला म्हणत ” आध्यात्मिक रूप से रामावतार का कारण और सांसारिक रूप से एक बहुत ही नेक,धार्मिक, सरल स्वभावी इंसान और मेरे अतिप्रिय मित्र अरविंद त्रिवेदी जी को आज मानव समाज ने खो दिया। नि:संदेह वे सीधे परमधाम जाएंगे और भगवान श्रीराम का सानिध्य पाएंगे।” अशी भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केलेली पाहायला मिळतेय. तर सीता साकारणाऱ्या अभिनेत्रीनेदखील त्यांना आदरांजली वाहिली आहे त्या म्हणतात “अरविंद त्रिवेदी” ह्यांचं काम खूपच सुंदर होत ते एक चांगले व्यक्ती होते. ते आमच्या कायम स्मरणात राहतील”. अरविंद त्रिवेदी यांच्या जाण्याने कलासृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांना आमच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली…