राजा राणी ची गं जोडी या मालिकेत आता लवकरच नवा ट्विस्ट येणार आहे. ऐन निवडणुकीच्या दिवशीच मालिकेतील रणजित पुण्याला निघून गेला होता तो कुठे गेला होता याचा त्याने संजीवनीला अजूनही खुलासा केलेला नाही. पुण्यात झालेल्या स्फोटाचा खुलासा करण्याची जबाबदारी आता रणजित वर आली आहे. हे मिशन तो कसे पूर्ण करतो याची उत्कंठा आहे. मात्र दुसरीकडे देशाच्या रक्षणासाठी रणजित सज्ज झालेला पाहायला मिळतो आहे आणि या मिशनमध्ये त्याला साथ देणारी साक्षी या नव्या पात्राची मालिकेत एन्ट्री करण्यात आली आहे. मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षकांना संभ्रमात पाडणारा आहे.

कारण मालिकेत आजच्या भागात रणजित आणि साक्षी एका लग्नाच्या हॉल मध्ये उभे असलेले पाहायला मिळतात. संजीव आणि राधिका यांचा तेथे विवाह सोहळा पार पडणार आहे. हा एक मिशनचाच भाग असल्याचे म्हटले जात आहे. रणजित आता संजीव आणि साक्षी आता राधिका बनून हे मिशन पार पाडणार आहेत. संजीव आणि राधिका बनून हे दोघे आता कोणती नवी खेळी खेळणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र ह्या मिशनचा खुलासा कधी होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास रणजित मात्र साक्षीसोबत लग्न करणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. रणजितच्या दुसऱ्या लग्नाचा ठाव संजीवनीला लागणार का की तिला याबाबत काहीच कळून देणार नाही हे येत्या भागातच अधिक स्पष्ट होईल. मालिकेत साक्षीची एन्ट्री तितक्याच दणक्यात झालेली पाहायला मिळाली ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.. अभिनेत्री अनघा काकडे हिने साक्षीची भूमिका साकारली आहे. अनघा काकडे ही लेखिका, दिग्दर्शिका तसेच अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते. शालेय शिक्षण घेत असताना अनघाने अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

विशेष म्हणजे इयत्ता ६ वि ते बीएच्या शेवटच्या वर्षापर्यंत तिने सावरकर वाड्मय वक्तृत्व स्पर्धेत केलेली भाषणं गाजवली आहेत. मॉडर्न कॉलेजमधून तिने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. दिगपाल लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली तिने अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. रसिक या एकांकिकासाठी अनघाला लेखन आणि अभिनयाचा माई भिडे पुरस्कार मिळाला आहे. क्षणपतूर शुवकालीन मावळी अंगाईचे दिग्दर्शन आणि कन्सेप्ट स्वतः अनघाने निभावले होते. एक उत्कृष्ट दिग्दर्शिका , लेखिका आणि अभिनेत्री म्हणून अनघा स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहे. कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धेच्या वेळी शरद पोंक्षे तिथे हजर होते . त्यांनी मालिकेत काम मिळावे म्हणून अनघाचे नाव अनेकांना सुचवले होते. यातून तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. राजा राणीची गं जोडी या मालिकेत ती साक्षीची भूमिका साकारत आहे. आतंकवाद्यांचा छडा लावण्यासाठी ती रणजितची साथ देताना दिसणार आहे त्यासाठी हे दोघेही आता आपली नावं लपवून लग्न करणार आहेत. ह्या शोधकार्यात संजीवनी देखील त्यांना साथ देणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.