जरा हटके

एवढ्या कमी दिवसांत पुष्पा चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई श्रेयशच्या आवाजाने देखील केली जादू

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनित पुष्पा चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत आहे. १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 300 कोटींची कमाई पूर्ण केली आहे. तेलगू व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या भरगोस कमाई विषयीची माहिती चित्रपट समीक्षक तरण आर्दश यांनी ट्विट करत शेअर केली आहे. त्यांच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “या चित्रपटाने हिंदी पडद्यावर ५६ कोटींची कमाई केली आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता श्रेयश तळपदे याने हिंदी व्हर्जनसाठी त्याचा आवाज दिला आहे.

pushpa film actors
pushpa film actors

अनेकांना असं वाटत होत कि श्रेयश याचा आवाज दमदार नाही त्याच्या आवाजाची छाप चित्रपटात पडणार नाही पण चित्रपट पाहणाऱ्यांनी त्याच्या आवाजाला भरगोस प्रतिसात देत योग्य आवाजाने चित्रपटात रंग भरल्याचा सांगितलं जात आहे. श्रेयश तळपदेसाठी हि मोठी जमेची बाजू मानली जात आहे कारण पुढे येणाऱ्या अल्लू अर्जुनच्या चित्रपटांसाठी त्यालाच पुन्हा काम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक निर्बंध असूनही पुष्पा चित्रपटाच्या हिंदी वर्जनने १६ दिवसांत ७५ कोटी कमावले आहेत आणि हे कलेक्शन वेगाने वाढत आहे. चित्रपटाने शुक्रवारी ३.५० कोटी, शनिवारी ६.१० कोटींची कमाई केली. एकूण: ₹ ५६.६९ कोटी. केस स्टडीनुसार हा चित्रपट लवकरच ७५ कोटींचा आकडा पार करेल.” हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने संपूर्ण देशभरात ३०० कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाची स्टोरी आणि निवडलेले स्टारकास्ट यांमुळेच हा चित्रपट तूफान कमाई करत आहे. प्रत्येक व्यक्ती चित्रपट पाहिल्यानंतर अल्लु अर्जुन आणि रश्मीकाच्या अभिनयाचं कौतुक करत आहे.

actor allu arjun and rashmika
actor allu arjun and rashmika

चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर याचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते. चित्रपटातील डायलॉग, गाणी आणि रश्मीकाचा हॉट अंदाज यांमुळे प्रेक्षक आधीच चित्रपट पाहण्यास फार उत्सुक होते. ड्रामा, थ्रिलर सस्पेन्स आणि रोमान्स या सर्व गोष्टींनी पुष्पा चित्रपट परिपूर्ण आहे. अशात रश्मीका आणि अल्लू अर्जुनाच्या अभिनयाबद्दल बोल्याचे झाल्यास रश्मीकाने २०१६ साली ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉर्मेड’ मुळे ती नॅशनल क्रश झाली. अल्लू अर्जुनने देखील अभिनय क्षेत्रात नाव कमविण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. अगदी लहान असताना त्याने काही चित्रपटांममध्ये बाल कलाकाराच्या भूमिका देखील साकारल्या आहेत. अशात सध्या चर्चेत असलेला पुष्पा या चित्रपटाचा पार्ट २ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि या चित्रपटामध्ये देखील अल्लूअर्जुन मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button