श्रीवल्ली मेरी बायको पुरी दुनियाको दिखाएगा…. पुष्पा २ चित्रपटाच्या टीजरचा धुमाकूळ अवघ्या ४ तासात तब्बल १० मिलियन
आजच्या घडीतला भारतातील सर्वात महागडा स्टार “अल्लू अर्जुन” ओळखला जातो. ३०० कोटी रुपये हे एखाद्या चित्रपटाचं बजेट नाही तर एका साऊथ चित्रपट अभिनेत्याने फक्त एका चित्रपटासाठी घेतलेले हे मानधन आहे. वाचून धक्का बसला ना ! पुष्पा २ या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तब्बल ३०० कोटी घेतले आहेत त्यामुळे बॉलिवूड स्टारच नाही तर थलपती विजयलाही त्याने मागं टाकलं आहे. ५ डिसेंबर रोजी पुष्पा २ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला विविध कंपन्यांनी ब्रँड अंब्यासेडर बनवून त्याच्या कमाईत घसघशीत वाढ केली आहे.
आज १७ नोव्हेंबर रोजी तेलगू आणि हिंदी भाषेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पुष्पा २ चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला. आणि अवघ्या ४ तासात तब्बल १० मिलियन अधिक लोकांनी दिली पसंती. ह्या भव्य ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन लाल चंदन तस्कराच्या त्याच्या शीर्षकाच्या पात्राची पुनरावृत्ती करत आहे, तर रश्मिका त्याच्या प्रेयसीच्या आणि नंतर पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. नाटक, रहस्य, ॲक्शन, संगीत, रोमान्स आणि संस्कृती या सर्व गोष्टींचा डोस घेऊन ट्रेलर खूपच ढासू बनलाय प्रेक्षकांनी तर टीजरला खूपच पसंती दर्शवलेली पाहायला मिळत आहे.