Breaking News
Home / जरा हटके / मराठी कलाकारांचे क्रिकेटचे सामने सध्या सुरु असताना राणाच्या लूकची होतीय चर्चा पहा कोठे सुरु आहेत हे सामने

मराठी कलाकारांचे क्रिकेटचे सामने सध्या सुरु असताना राणाच्या लूकची होतीय चर्चा पहा कोठे सुरु आहेत हे सामने

अनेक वर्षानंतर आता पुन्हा मराठी कलाकार एकत्र येऊन क्रिकेटचे सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. pbcl म्हणजे “पुनीत बालन सेलिब्रिटी लीग” चे आयोजन ६ जानेवारी ते ९ जानेवारी २०२२ मध्ये सुरु झालेले पाहायला मिळत आहेत. हे सर्व सामने पुण्यात लिजंड्स क्रिकेट गाऊंड मुंढवा आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम सारसबाग रोड येथे खेळले जात आहेत. मराठीतील जवळपास सर्वच कलाकारांनी ह्यामध्ये सहभाग दर्शवला आहे. ह्यामध्ये एकूण ६ टीम असून त्यांची टीमची नावे देखील गडकिल्यांवर आधारित ठेवण्यात आली आहेत. मृण्मयी देशपांडे आणि प्राजक्ता माळी सोबत आणखीन बऱ्याच अभिनेत्री अँकरिंग करताना पाहायला मिळत आहेत.

pbcl actors captains
pbcl actors captains

ह्यामधील सर्व टीमची नावे देखील गडकिल्यांवर आधारित ठेवण्यात आली आहेत हे विशेष सिंहगड स्ट्रायकर्स, रायगड रॉयल्स, प्रतापगड वोरीयर्स, शिवनेरी लायन्स, पन्हाळा पँथर्स, तोरणा टायगर्स अशी ह्या टीम्सची नावे असून महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, सिद्धार्थ जाधव, शरद केळकर, प्रवीण तरडे आणि सुबोध भावे हे कलाकार कॅप्टन म्हणून नियुक्त होऊन हि स्पर्धा लढत आहेत. मराठी मालिका कलाकार चित्रपट कलाकार, यांच्यासोबत गायक, वादक आणि सेटवरील अनेक मंडळींनी ह्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला आहे. हे सामने प्रेक्षकांविना खेळले जाताना पाहायला मिळत आहेत. शिवाय कोणत्याही टीव्ही चायनलला हे सामने पाहायला मिळत नाहीत. हे सामने तुम्हाला पाहायचे असल्यास पुनीत बालन स्टुडिओज ह्या युट्यूब चायनावर तुम्हाला हे सामने लाईव्ह देखील पाहायला मिळणार आहेत. याचबरोबर पूर्वी झालेले सामने देखील याच ठिकाणी पाहायला मिळतील. आज ८ जानेवारी २०२२ रोजी ३ सामने खेळले जात आहेत. पन्हाळा पँथर्स विरुद्ध प्रतापगड वोरीयर्स हा सामना दुपारी २ वाजता खेळला जाणार आहे.

yousuf pathan and marathi actors
yousuf pathan and marathi actors

याच सोबत आणखी २ सामने आज खेळले जाणार आहेत. सिंहगड स्ट्रायकर्स विरुद्ध रायगड रॉयल्स हा सामना आज ४..३० मिनीटांनी खेळला जाणार आहे. तर तिसरा सामना रात्री ७ वाजता पन्हाळा पँथर्स विरुद्ध शिवनेरी लायन्स असा खेळला जाणार आहे. उद्या रविवार ९ जानेवारी रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. जवळपास ४ लाख रुपयांची पारितोषिके ह्या सामन्यात देण्यात येणार आहेत. सामने सुरु होण्यापूर्वी क्रिकेटर युसूफ पठाण ह्यांनी हजेरी लावून ह्या सामन्यांचे उदघाटन केले होते. तर सामन्यांची सांगता करताना अनेक दिग्गज क्रिकेटर पाहायला मिळणार असल्याची चर्चा होत आहे. ह्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते राणा साकारणाऱ्या हार्दिक जोशी हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहे. जवळपास ९० मराठी कलाकारांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याने सामन्यांना रंग चढला आहे. अंतिम सामन्यात मिळणारी बक्षिसे आणि रक्कम हि काही सामाजिक संस्थाना देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *