
काही दिवसांपासून पाऊस खूपच जास्त पडतोय त्यामुळे पालेभाज्यांच्या भावात चांगलीच घसरण झालेली पाहायला मिळतेय. त्यात ह्या महामारीचा काळ त्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणारे क्वचितच पाहायला मिळतात. पावसामुळे पालेभाज्या आणि टोमॅटो लवकर खराब होतात. शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेला मालही मोठ्या प्रमाणात आल्याने आणि त्यात भाजीपालाचा खप न झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळतेय. पुण्यात आज मार्केट यार्ड परिसरात भाजी व्यापाऱ्यांचे हे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळतात. ह्या व्हिडिओमध्ये मार्केटयार्ड परिसरातील व्यापारी भाज्या, टोमॅटो, वांगी कार्ली, मेथी, कोथिंबीर, पालक ह्यांसारख्या भाज्या अगदी कमी किमतीत विकताना पाहायला मिळाल्या. पण तरीही गिराहीक येईना हे पाहून जे घायचंय ते घ्या काय द्यायचं ते द्या असं चित्र निर्माण झालं.

पण तरीही गिराइक येईनात हे पाहून आता फुकट विकतो फुकट तरी घ्या अशी म्हणायची वेळ आली. अनेकांना भाज्या फुकट देऊ केल्या आपल्याकडे चांगला माल खराब होऊन सडण्यापेक्षा एखाद्या गरीबाची भूक तरी भागली जाईल आणि पैसे नाही तर गरिबांचे आशीर्वाद तरी मिळतील अश्या आशेने अनेकांनी भाजीपाला फुकट विकायला सुरवात केलेले अनेक व्हिडिओ आता व्हायरल होताना पाहायला मिळतात. मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचेच हे असे हाल असतील तर शेतकऱ्यांना माल उगवण, आलेला माल काढणं आणि तो मार्केटपर्यंत घेऊन जाणे ह्याचा खर्च देखील निघत नसल्याचं भयाणक चित्र ह्या व्हिडिओमधून आपल्याला समजून येईल. पुण्यासारख्या मोठी लोकवस्ती असलेल्या भागात हे हाल असतील तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाली उरला नाही असच म्हणणं योग्य ठरेल. व्यापारी पुन्हा कमावतील पण शेतकऱ्याला किमान त्याच्या मेहनतीचं फळ देखील ह्या पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. कधी गारपीट तर कधी महापूर तर कधी दुष्काळ सगळ्याच अडचणीत शेतकऱ्याचे हाल होताना नेहमीच पाहायला मिळतात.