फुलवंती चित्रपटामुळे प्राजक्ता माळी आता निर्मिती क्षेत्रातही यशाचा पल्ला गाठताना दिसत आहे. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून तिने तिच्या चाहत्यांचे नेहमीच आभार मानले आहेत. अशातच आता या चाहत्यांच्या अधिक जवळ जाण्यासाठी तिने आस्क मी एनीथिंग मधून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचे ठरवले. या माध्यमातून तिच्या चाहत्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. अध्यात्मिकतेकडे कधी वळली यावर तिने उत्तर देताना म्हटले की, जेव्हा ब्रेकअप झालं त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते.
पण अध्यात्मतेचा मार्ग स्वीकारला आणि तटातून मी बाहेर पडले असे ती उत्तर देताना दिसली. यावेळी फुलवंती चित्रपटाबद्दलही चाहत्यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं. तर एका चाहत्याने तिला चक्क लग्नाची मागणी देखील घातलेली पाहायला मिळाली. ” तू माझ्याबरोबर लग्न करणार का , तुझ्यामुळे मी पण लग्न नाही केलं…” यावर प्राजक्ता उत्तर देताना म्हणते की, “माझं काही खरं नाही…तुम्ही करून टाका (सगळेच जे थांबलेत..) (जनहित में जारी…) (spread the word)…म्हणत प्राजक्ताने अजूनतरी लग्न करणार नाही असे म्हटले आहे. याशिवाय तुमचा कोणी क्रश आहे का? असाही तिला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा प्राजक्ताने २ दाक्षिणात्य अभिनेत्यांची नावं घेतली. “अगोदर ‘नानी’ आवडत होता , आणि आता ‘जयम रवी’ आवडतो. दोघेही दाक्षिणात्य सुपरस्टार आहेत. पण तरीही माझं ‘रणबीर’वर कायम प्रेम राहील.” असे म्हणत तिने ३ स्टार्सची नावं घेतलेली पहायला मिळाली.
नानी आणि जयम यांच्यापेक्षाही प्राजक्ताचा क्रश म्हणजे रणबीरच आहे हे तिने यातून स्पष्ट केले आहे. दरम्यान आता प्राजक्ता लवकरच एका आगामी प्रोजेक्टबद्दल उत्सुक असल्याचे पहायला मिळते. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेअगोदर आपण कधी अभिनय क्षेत्रात येऊ असा तिने विचारही केला नव्हता. पण आता या क्षेत्रात चांगली रमतेय असे ती सांगताना दिसते.
पण सर्वात जास्त आवडतो हा बॉलिवूड अभिनेता