प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताच्या बहिणीची झाली रिप्लेसमेंट… नुकतंच लग्न झालेली ही सुंदर अभिनेत्री साकारणार भूमिका
स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मुक्ता आणि सागर आता एकमेकांच्या प्रेमात आहेत त्यांचा संसार सुरळीत सुरू असताना सावणीच्या आणि हर्षच्या लग्नाची गडबड त्यांच्या आयुष्यात नवीन वादळ घेऊन येत आहे . मिहिका हर्षच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेली पाहून मुक्ता तिची मदत करायला जाते पण इथे हर्ष मुक्ता आणि मिहिकावरच खोटे आरोप लावताना दिसतो आहे. मिहिका आणि मुक्ता या दोघी बहिणी मिळून मला बदनाम करतायेत असा आरोप करत हर्ष सगळी बाजी पलटवताना पाहायला मिळाला. त्यामुळे मुक्ता पूर्णपणे हतबल झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान मालिकेत या रंजक ट्विस्ट नंतर आणखी एक मोठा बदल घडून येत आहे.
कारण मिहिकाची भूमिकेत आता दुसऱ्याच नायिकेला पाहायला मिळणार आहे. यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या मिहिकाला परत बोलवा अशी मागणीही करण्यात येत आहे. मिहिकाची भूमिका अभिनेत्री मृणाली शिर्के हिने साकारली होती. पण आता तिने ही मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोत मिहिकाची भूमिका आता अभिनेत्री अमृता बने साकारत आहे. अमृता बने हिचा काही दिवसांपूर्वीच अभिनेता शुभंकर एकबोटे सोबत विवाह झाला होता. लग्नावेळी दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची सून म्हणून ती चर्चेत आली होती. कन्यादान मालिकेनंतर आता अमृता प्रेमाची गोष्ट मालिकेत मिहिकाची भूमिका साकारत आहे.
दरम्यान मृणाली शिर्के हिने मालिका का सोडली याबद्दल चाहत्यांची प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला तूच हवी आहेस तरच आम्ही मालिका बघू अशा भावनिक प्रतिक्रिया तिच्याबद्दल दिल्या जात आहेत. पण मृणालने मालिका सोडण्यामागचे कारण म्हणजे तिचा आगामी प्रोजेक्ट आहे. मृणालि सध्या एका शॉर्टफिल्मच्या तयारीला लागली आहे. या शॉर्टफिल्मसाठी वेळ देता यावा म्हणून मृणालीने मालिकेतून काढता पाय घेतला आहे. पण मालिकेचे दिग्दर्शक आणि कलाकारांच्या टीम सोबत काम करून खूप छान वाटले असे म्हणत तिने सेटवरचा शेवटच्या शूटचा व्हिडीओ शेअर केला आहे.