Breaking News
Home / जरा हटके / तुम्ही ह्या चिमुरडीला ओळखलंत ? आणखी एका सोशल स्टारची मराठी मालिकेत एन्ट्री

तुम्ही ह्या चिमुरडीला ओळखलंत ? आणखी एका सोशल स्टारची मराठी मालिकेत एन्ट्री

टिक टॉक स्टार असो किंवा रील व्हीडीओजच्या माध्यमातून अनेक कलाकारांना आजवर अभिनयाची संधी मिळाली आहे. या कलाकारांना मालिकांमधून मुख्य नायिकेच्या भूमिका साकारण्याची संधी देखील मिळताना दिसत आहे मग यात बालकलाकार कसे मागे राहतील. कारण हे बालकलाकार सध्या मराठी मालिकांमधील दुवा बनलेले पाहायला मिळत आहेत. सध्या मराठी मालिकांमधून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवलेल्या बालकलाकारांची एन्ट्री होत आहे. माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेतली लाडकी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ हिने देखील मालिकेत स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.

pinkicha vijay aso actors
pinkicha vijay aso actors

देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत देखील सोशल स्टार असलेल्या ‘मीमी खडसे’ हिने देखील अशीच प्रसिद्धी मिळवली आहे. तर रंग माझा वेगळा या मालिकेतील साईशा भोईर ही बालकलाकार देखील सोशल मीडिया स्टार आहे. आता आणखी एका मालिकेतून अशीच एक सोशल स्टार बालभूमिकेत झळकताना दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रसारित करण्यात आली आहे. या मालिकेत अनेक कलाकार झळकताना दिसत आहेत. या मालिकेतील ओवीची नटखट भूमिका साकारणारी बालकलाकार देखील सोशल मीडिया स्टार आहे. ओवीची भूमिका साकारणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे “साईशा साळवी”. साईशा साळवी ही चाईल्ड मॉडेल आहे. तसेच सोशल मीडियावर ती प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. साईशाचे अनेक रील व्होडिओज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. साईशाचे आई वडील पुण्यात वास्तव्यास आहेत.श्वेता साळवी आणि हेमंत साळवी या दाम्पत्यास दोन कन्या आहेत. हेमंत साळवी हे हॉटेल व्यावसायिक आहेत साईशा ही त्यांची थोरली लेक आहे. साईशा अवघ्या ४ वर्षांची आहे पण एवढ्या कमी वयातच तिने मॉडेलिंग क्षेत्रात उंच भरारी घेतलेली पाहायला मिळत आहे.

saisha salvi actress
saisha salvi actress

लहान मुलांच्या कपड्यांच्या विविध ब्रॅण्डसाठी साईशाने काम केले आहे. तर विविध मंचावर तिने रॅम्पवॉक करत उपस्थितांची मने जिंकली आहेत. हेन्को केअर, पी एन जी ज्वेलर्स, Belmac अशा विविध व्यावसायिक जाहिरातीतून साईशा टीव्ही क्षेत्रात झळकली आहे. टाइम्स फॅशन विक, बॉलिवूड फॅशन विक यासारख्या मोठ्या मंचावर साईशा गेल्या काही वर्षांपासून रॅम्पवॉक करताना दिसते. या सर्व यशाच्या पाठीमागे साईशाची आई श्वेता साळवी यांची भक्कम साथ आहे. याच प्रसिद्धीचा फायदा म्हणून साईशा आता अभिनय क्षेत्रात देखील काम करताना दिसत आहे. पिंकीचा विजय असो या कोठारे व्हिजन प्रस्तुत मालिकेतून साईशा झळकताना दिसणार आहे. या मालिकेत ती ओवीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी साईशा साळवी या चिमुरडीला मनःपूर्वक शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *